श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नागपुर : 12 डिसेंबर 2025
नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना स्मार्ट सिटी प्रकल्पातील कथित अनियमिततेप्रकरणी नागपूर पोलिस आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचीट मिळाली आहे. भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह अन्य आमदारांनी गंभीर आरोप करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. विधानसभेत या विषयावर लक्षवेधी मांडण्यात आली होती..
नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पातील कथित अनियमिततेच्या प्रकरणात वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना नागपूर पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचिट (Clean Chit) मिळाली आहे; याबद्दल विधानसभेत भाजप आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते, परंतु चौकशीत त्यांना क्लीनचिट मिळाल्याने कारवाई झाली नाही.
भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर स्मार्ट सिटी प्रकल्पात अनियमिततेचे आरोप केले होते आणि त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती.
या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेने तपास केला.तपासानंतर तुकाराम मुंढे यांना क्लीनचिट देण्यात आली, त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजला होता, परंतु क्लीनचिट मिळाल्याने प्रकरण शांत झाले.
आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके यांनी मुंढे यांच्यावर आरोप केले होते की, त्यांनी नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नसतानाही नियमबाह्यपणे प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतला. तसेच, 20 कोटींहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार केल्याचा दावाही आमदारांनी केला होता. त्यांनी मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. तत्कालीन सत्तापक्ष नेत्यांनी सर्व कागदपत्रांसह सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र मुंढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही.
नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना स्मार्ट सिटी प्रकल्पातील कथित अनियमिततेप्रकरणी नागपूर पोलिस आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचीट मिळाली आहे. भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह अन्य आमदारांनी गंभीर आरोप करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. विधानसभेत या विषयावर लक्षवेधी मांडण्यात आली होती.
तब्बल 5 वर्षानंतर कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी असलेल्या तुकाराम मुंडे यांना नाहक बदनाम केल्या गेले. त्यामुळे प्रशासनातील प्रामाणिक अधिकारी सुद्धा खचले होते. परंतु तुकाराम मुंडे सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार व नाना पटोले यांनी पाठराखण केल्याने प्रशासनातील प्रामाणिक अधिकाऱ्यांमागे काही राजकीय नेते सुद्धा आहेत असा संदेश प्रशासनात गेला. पण तुकाराम मुंडे यांच्यावर बिनबुडाचे आरोप लावणाऱ्या क्रृष्णा खोपडे व प्रवीण दटके यांच्यासारख्या भाजप आमदारांचे काय? खोटे आरोप लावुन ते जनतेत हिरो बनण्यापेक्षा आज झिरो झालेले बघितले गेले. हे मात्र नक्की.



































