श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 2 जानेवारी 2026
प्रत्येक नगरसेवकाला आमदार व्हायचे असते. नागपुरातील कित्येक नगरसेवक हे आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार ही बनले. परंतु नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस च्या एका आमदाराने अगदी उलट राजकीय प्रवास सुरू केला आहे. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांनी आपल्या परंपरागत पांढराबोडी परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 13 मधून लढण्याचा निर्णय घेतला आहे.तसे बघता मुख्यमंत्री बनल्यावर कोणी उपमुख्यमंत्री बनत नाही तो प्रधानमंत्री बनण्याचे स्वप्न बघतो. पण राजकारणात काहीही घडते. मुख्यमंत्री बनलेले देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री बनलेत. त्यामुळे राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. तसे बघता सर्वच राजकीय पक्षांचे मोठे नेते यांच्यासोबत माजी आमदार प्रकाश गजभिये यांचे घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. भाजप चे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, रिपाइ चे रामदास आठवले, वंचित चे बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, अजित पवार पासुन तर कांग्रेस चे विकास ठाकरे या सर्व राजकीय नेत्यांसोबत अगदी जवळचे संबंध माजी आमदार प्रकाश गजभिये यांचे राहिलेले जनतेने बघितले आहे.





Prakash Gajbhiye हे नागपूरमधील एक प्रसिद्ध राजकारणी आहेत, जे NCP (शरदचंद्र पवार गट) चे नेते आहेत आणि माजी आमदार आहेत. त्यांनी नागपूर महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे आणि ते नगरसेवक म्हणूनही कार्यरत होते, तसेच सध्या ते पुन्हा मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, विशेषतः परंपरागत पांढराबोडी परिसरातून.
राजकीय पार्श्वभूमी : त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामधून (RPI) केली होती . पश्चिम नागपूरमधील झोपडपट्टी भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क मानला जातो. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.नागपुर महानगरपालिका मध्ये ते जवळपास 25 वर्ष नगरसेवक राहिले. ते नागपूर महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते आणि नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहिले आहेत. नागपुरच्या महानगरपालिका च्या राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेले जेष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेवर आमदार म्हणून राहिले तरीही त्यांचा खरा कल आणि आवड ही नागपुरातील राजकारणात राहिली. प्रकाश गजभिये हे मनपा राजकारणापासून दुर राहु शकत नाही. त्यामुळे त्यांनी महानगरपालिका निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला.

अडचणीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले मदतीला धाऊन
राजकारणात एकमेकांचे कितीही विरोधक असले तरी राजकारणापलीकडे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे संबंध असतात हे काही लपलेले नाही. काश्मीरमध्ये बर्फावरून पाय घसरल्याने प्रकाश गजभिये गंभीर जखमी झाले होते, त्यांना मुंबईत उपचारासाठी हलवण्यात आले होते. प्रकाश गजभिये यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष विमानाने मुंबई येथील लीलावती रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले होते . गजभियेंकडून फडणवीसांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.प्रकाश गजभिये यांना विशेष विमानाने एअर लिफ्ट करीत मुंबईत आणले. त्यांचा दिल्ली ते मुंबई खाजगी विमानखर्च व लीलावती रुग्णालयातील सर्व खर्च राज्य सरकारने केला होता. राजकारणापलीकडे असलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या मैत्रीला त्यांनी जपले त्याबद्दल प्रकाश गजभिये यांनी त्यांचे आभार मानले होते.
नागपुरच्या महापौर पदी प्रकाश गजभिये ची नितांत गरज




थोडक्यात, प्रकाश गजभिये हे नागपूरच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नाव असून, ते स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत.नागपुरातील हाँकर्स चा प्रश्न, झोपडपट्टी विकास व पुनर्वसन प्रश्न तसेच गतीमान स्मार्ट सिटी च्या विकासासाठी प्रकाश गजभिये यांच्यासारख्या सक्षम व अनुभवी नेत्रृत्वाची नितांत गरज आहे. नागपुरातील शासकीय जमिनी वर वसलेल्या अनेक झोपडपट्ट्यांना अतिक्रमण कारवाई पासुन रोकणारे प्रकाश गजभिये वेळोवेळी झोपडपट्टी धारकांच्या मदतीला धावून जातात. झोपडपट्टी वासियांसाठी ते एकप्रकारे देव आहेत. काही ठिकाणी तर आजही त्यांच्या नावाने झोपडपट्टी वसलेल्या आहेत. नागपुरातील सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाश गजभिये यांनी अंबाझरी, पांढराबोडी, हिलटाँप परिसरात सर्वांना एकत्र करीत सर्व धर्म समभाव जपला. नागपुरातील सर्वात मोठा व आकर्षक गणेश म्हणुन हिलटाँपचा राजा म्हणून ओळख असलेल्या हिलटाँपच्या राजा ची संकल्पना प्रकाश गजभिये यांनी आणली. एकता गणेश उत्सव मंडळ चा हिलटाँप चा राजा,एकता दुर्गा उत्सव मंडळ, डांडिया महोत्सव, सेव्हन रोज चर्च येथील कार्यक्रम आयोजित करण्यात प्रकाश गजभिये यांचा सिंहाचा वाटा आहे.
आमदार म्हणून उल्लेखनीय कामगिरी
मिहानमधिल प्रकल्पग्रस्ताना जमीनीचा मोबदला मिळत नसेल तर खापरी, दहेगाव, तेल्हारा कलकुही येथील शेतकर्यांना जमिनी परत करण्याची मिहानकडे तत्कालीन आ. प्रकाश गजभिये यांची मागणी शिष्टमंडळ मिहानचे मुख्य अभियंता चटर्जी व मिहानचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांना भेटले.शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले त्यामुळे या भागातील शेतकरी प्रकाश गजभिये यांचे आजही आभार मानतात. हेमंत करकरे यांच्या म्रृत्यु नंतर त्यांच्या विषयी अभद्र वक्तव्य करणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकुर विरोधात तसेच भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी, संत तुकाराम महाराज यांच्या अपमानप्रसंगी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यष्ट्र भुमिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी आगळेवेगळे वेशभूषा धारण करीत मुंबई च्या अधिवेशनात सर्वांचे लक्ष वेधले होते.
नागपुरच्या दीक्षाभुमी व मुंबईतील चैत्यभूमीवर आंबेडकरी कार्यक्रमांचे आयोजन


माजी आमदार प्रकाश गजभिये हे दरवर्षी नागपुरच्या दीक्षाभुमी परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व भोजनदान आयोजित करतात. दीक्षाभुमी वर येणारे आंबेडकरी अनुयायी दरवर्षी माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या पेंडाल ला आवर्जून भेट देतात. तसेच मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दादर मुंबई येथील चैत्यभूमी वर सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे सारख्या दिग्गज गायकांचे कार्यक्रम आयोजित केले. याठिकाणी राज्यातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायी उपाशी राहू नये यासाठी नित्यनेमाने भोजनदानाची व्यवस्था माजी आमदार प्रकाश गजभिये करतात.
देवाभाऊंची क्रृपा झाल्यास प्रकाश गजभिये महापौर बनु शकतात

असा हरहुन्नरी नेता असलेल्या प्रकाश गजभिये यांनी नागपुर महानगरपालिका मध्ये नगरसेवक ते विरोधी पक्षनेता अशी दमदार कामगिरी केलेली आहे. सध्या महापौर पदाचे आरक्षण निघालेले नाही. परंतु मागील 25-30 वर्षात नागपुर महानगरपालिकांचा महापौर हा बौद्ध समाजाचा झालेला नाही. त्याआधी बौद्ध समाजाचा महापौर झालेला होता.आगामी महानगरपालिका निवडणुकीत नागपुरच्या पांढराबोडी प्रभागातुन प्रकाश गजभिये निवडुन येताच त्यांच्या राजकीय कर्तुत्व व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय मैत्रीचा वारसा जपत प्रकाश गजभिये यांच्या नावावर महापौर पदासाठी शिक्कामोर्तब होऊ शकतो.प्रकाश गजभिये यांचे नेतृत्व राजकारणापलीकडील. नागपुरच्या राजकारणातील देवेंद्र फडणवीस व प्रकाश गजभिये हे दोन धुरंधर आहेत. कधीकाळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रकाश गजभिये यांचे दोन्ही नेते आठवले व अजित पवार हे महायुतीत आधीच आहेत. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत.उद्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्यास भाजप महायुतीचा पहिला बौद्ध महापौर म्हणुन प्रकाश गजभिये यांना बनविले जाऊ शकते असे म्हणायला काही हरकत नाही.




































