श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 28 जानेवारी 2026
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष जननेते अजितदादा पवार यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र आज शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील एक ‘कर्मठ’ आणि ‘स्पष्टवक्ता’ अध्याय संपला आहे.
”अजितदादांसोबत 2004 मध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. त्यांच्या कामाची शिस्त शब्दांत न मांडण्यासारखी होती. सकाळी 6 वाजता मंत्रालयात हजर राहून जनसेवेचा यज्ञ सुरू करणारा असा नेता होणे शक्य नाही. प्रशासनावर त्यांची असलेली घट्ट पकड, विषयाचा सखोल अभ्यास आणि कामाला न्याय देण्याची वृत्ती यामुळे ते खऱ्या अर्थाने ‘लोकनेता’ ठरले.
एकदा मला वेळ देऊनही मला अर्धा तास उशीर झाला, तेव्हा त्यांनी केवळ माझी विचारपूसच केली नाही, तर मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत माझी गाडी सुरक्षित येईल याची जातीने खात्री केली. इतका मोठा नेता असूनही त्यांचा हा संवेदनशील स्वभाव मनाला चटका लावून जाणारा आहे. आज आपण केवळ एक नेता नाही, तर महाराष्ट्राचा एक कणखर आधार गमावला आहे.”
प्रशासकीय शिस्त, वेळेचे पक्के आणि कामात स्पष्टवक्तेपणा ही दादांची ओळख होती.
त्यांची अद्वितीय कार्यशैली होती. सकाळी 6 पासून लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणारा ऊर्जावान नेता म्हणून त्यांची ओळख होती.
बहुजन रिपब्लिकन नेता म्हणून मी दादांच्या कार्याला सलाम करत आहे.
”अजितदादांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. ईश्वर त्यांच्या परिवाराला हे अतीव दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.”
विनम्र श्रद्धांजली !
– ॲड. सुलेखाताई कुंभारे
माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.



































