भाजपने नगराध्यक्ष पदासह 11 प्रभागात मिळवला विजय
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला नगरपंचायत /नागपुर : 21 डिसेंबर 2025
नागपुर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत निवडणुकीत भाजपने विजयाची हैट्रिक साधली. नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विकासकामाला पसंती देत याठिकाणी जनतेने विजयाचा कौल भाजपच्या बाजुने दिला.
मागील 10 वर्षापासुन सत्तेत असलेल्या भाजपला कांग्रेस धक्का देत सत्तापरिवर्तन करेल अशी जनतेत चर्चा होती. परंतु ही चर्चा फोल ठरली. जनतेने भाजपला परत एकदा सत्तेत बसवले.
नगराध्यक्ष पद व 11 नगरसेवक भाजपचे विजयी
भाजप च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हेमलता मनोज सावजी यांनी नगराध्यक्ष पदी दणदणीत विजय मिळविला. त्यांना एकुण 6517 मते मिळाली तर कांग्रेसच्या सुषमा रत्नदीप रंगारी यांना 5234 मते मिळाली. तर महादुला नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे 11 नगरसेवक ही निवडुन आले.


कांग्रेस चे 5 नगरसेवक व शिवसेना शिंदे पक्षाचा 1 नगरसेवक विजयी
यंदा झालेल्या निवडणुकीत चुरशीची लढत जनतेला बघायला मिळाली. कांग्रेसचे 5 नगरसेवक निवडून आले तर शिवसेना शिंदे पक्षाने महादुला नगरपंचायत निवडणुकीत आपले खाते उघडता एक नगरसेवक निवडुन आणला.
प्रभाग क्र. 3 मधील कांग्रेस च्या नवनिर्वाचित नगरसेविका आम्रपाली सोनारे


शिवसेना शिंदे पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक सचिन बाळकृष्ण वानखेडे
महादुला नगरपंचायत निवडणुकीत पक्षीय बलाबल
प्रभाग क्र. 1)-स्वाती लांडे (भाजप) – विजयी
प्रभाग क्र. 2) अभिजित ढेंगरे (भाजप) – विजयी
प्रभाग क्र. 3)आम्रपाली सोनारे (कांग्रेस) विजयी
प्रभाग क्र. 4)नंदा तुरक (भाजप) विजयी
प्रभाग क्र. 5)अजय सोलंकी (भाजप) विजयी
प्रभाग क्र. 6)गोपालसिंग मदनसिंह नैकाने (भाजप) विजयी
प्रभाग क्र. 7)वैशाली पवन पखिड्डे (भाजप) विजयी.
प्रभाग क्र. 8)गंगा विजय जैन (भाजप) विजयी.
प्रभाग क्र. 9) पुजा अजय मेश्राम (कांग्रेस) विजयी.
प्रभाग क्र. 10) सचिन बाळकृष्ण वानखेडे (शिवसेना शिंदे) विजयी.
प्रभाग क्र. 11)सोनु उघडे (भाजप) विजयी.
प्रभाग क्र. 12)अतुल शामराव मानवटकर (कांग्रेस) विजयी
प्रभाग क्र. 13)संध्या साबळे (भाजप) विजयी.
प्रभाग क्र. 14)राजकुमार उईके (भाजप) विजयी.
प्रभाग क्र. 15)स्वाती पटले (भाजप) विजयी.
प्रभाग क्र. 16)प्रतिभा तिलक गजभिये (कांग्रेस) विजयी.
प्रभाग क्र. 17)मंगेश सुधाकर देशमुख (कांग्रेस) विजयी.

महादुला नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना पडलेली एकुण मते
विजयी उमेदवार नगराध्यक्ष – हेमलता मनोज सावजी (भाजप) मिळालेली मते (6517)
उमेदवारांना मिळालेली एकुण मते
साधना काटकर- 803
हेमलता सावजी- 6517 मते
अर्चना मंडपे – 215(राष्ट्रवादी काँग्रेस)
सुषमा रत्नदीप रंगारी – 5294 (कांग्रेस)
मिनाक्षी कुरील- 80 मते (अपक्ष)
नोटा 155
एकुण 13066



































