श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
महादुला नगरपंचायत /नागपुर : 15 नोव्हेंबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील कामठी तालुक्यात असलेल्या महादुला नगरपंचायत निवडणुक 2025 करिता आज पाचव्या दिवशी 3 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दि. 11 नोव्हेंबर 2025 पासुन नगरपंचायत निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु प्रस्थापित राजकीय राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजप व काँग्रेस चा उमेदवारी देण्याचा घोळ काही मिटला नाही त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करताना सध्या जटील कागदपत्र पुर्तता होत नसल्याने उमेदवारांचा मुड खराब होत आहे. जात प्रमाणपत्र,जात पडताळणी प्रमाणपत्राकरिता शिफारस पत्र, पोचपावती, त्याचबरोबर मतदारयादीत उमेदवाराचे नाव असलेल्या यादीची साक्षांकित प्रत, सुचक, अपत्यासंबंधी शपथपत्र, शौचालय प्रमाणपत्र, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र तसेच शपथपत्रांची नोटरी तसेच नामनिर्देशन पत्र आँनलाईन पद्धतीने दाखल करणे व आँनलाईन नामनिर्देशन पत्राची छाननी ची प्रक्रिया यांवर मागील 4 दिवसांपासून उमेदवारांची मगजमारी होत होती. यावेळी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी कामठी तहसील कार्यालयात जायची गरज नाही महादुला नगरपंचायत कार्यालयातच ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ही डोकेदुखी कमी झाली.

आज पाचव्या दिवशी दि. 15 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभाग क्रमांक 6 – प्रदीप गुणेश रहांगडाले (अपक्ष), प्रभाग क्रमांक 10 – अनिल केशव बोरकर (अपक्ष), प्रभाग क्रमांक 16- सौ. प्रिती राष्ट्रगण चंद्रशेखर (अपक्ष) या उमेदवारांनी आपले अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी गणेश जगदाळे यांचेकडे दाखल केले.
उद्या दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आणि सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येईल अशी माहिती निवडणुक अधिकारी यांनी दिली.
बहुतेक अर्ज रविवार व सोमवारी दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

































