श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी /नागपुर : 1 जानेवारी 2026.
1 जानेवारी 1818 साली झालेल्या भीमा कोरेगावच्या रंनसंग्रमात पेशव्यांच्या सैन्यविरुद्ध जिंकु किंवा मरू या भावनेने 28 हजार पेशव्या सैनिकाना फ़क्त 500 महार सैनिकांनी ठार मारुंन विजय मिळविला होता तेव्हा या वीर भीम सैनिकांच्या स्मरणार्थ आज जय स्तंभ चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बरीएमं च्या वतीने 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य विजय दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
त्यानुसार सकाळी 11 वाजता परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले तसेच साकारलेल्या भीमा कोरेगाव विजय स्तंभास अभिवादन वाहण्यात आले. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनावर आपल्या वक्तव्यातून प्रकाश टाकून उजाळा दिला. याप्रसंगी मोठ्या संख्येत आंबेडकरी अनुयायी व माजी सैनिक उपस्थित होते. या प्रसंगी कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम यांच्या सह कामठी शहर अध्यक्ष दिपंकर गणविर, सुभाष सोमकुवर, उदास बंसोड, नियाज कुरेशी, दिपक सिरीया, अंकुश वांबोर्डे, अनुभव पाटील, अशपाक कुरेशी उपस्थित होते.































