श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक।
VANSH NEWS Digital media services.
कोथरुड /पुणे :3 आँगस्ट 2025
घरगुती हिंसाचारातील एका पिडितेला मदत केल्याच्या रागातून तीन तरुणी असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. कोथरुड पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले तसेच त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याबाबत श्वेता एस व्ही नावाच्या तरुणीने फेसबुकवर पोस्ट करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
बिना वारंट ने कोथरुड पोलिसांकडुन 3 मुलींच्या खोलीची झडती
प्राप्त माहितीनुसार संभाजीनगरची एक तरुणी सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात एका मैत्रिणीच्या सहाय्याने या तीन मुलींच्या फ्लॅटवर राहायला आली. या मुलींनी त्या संभाजीनगरच्या मुलीला मदत केली. संभाजीनगरच्या मुलीच्या सासरच्यांनी तिच्या विरोधात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. याच मुलीला शोधण्यासाठी संभाजीनगरचे पोलीस पुण्यात दाखल झाले आणि तिच्या मोबाईलच्या लोकेशन नुसार पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या या तीन मुलींच्या घरी गेले. त्यावेळी संभाजीनगरची मुलगी कामासाठी निघून गेली होती. मात्र या पोलिसांनी या मुलींकडे सगळी चौकशी करायला सुरुवात केली. चौकशी करायला आलेल्या पुणे शहरातील कोथरुड पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक ह्या बिना वारंट गेल्या त्या तरुणींची जर चौकशी करायची होतु तर त्या मुलींच्या खोलीची झडती कोथरुड पोलिसांनी का घेतली. कोथरुड पोलीस हे सिव्हिल ड्रेसवर का गेले. एखाद्या मिसिंग प्रकरणात कुणाच्या घरी चौकशी ला पोलीस गेले तर त्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवा म्हणायचा जनतेला अधिकार आहे आधिकार ? पुणे पोलीस आयुक्त यांनी जनतेच्या सेवेसाठी पोलीस असतात पोलीस रक्षक असावेत भक्षक नसावेत है सुद्धा पोलीस आयुक्तांनी अजुनही पोलिसांना शिकविले नाही. हीच चौकशी करताना या तीन मुलींच्या फ्लॅटमध्ये घुसून त्यांचे कपडे चेक केले.मूलींच्या कपड्यात कोथरुड पोलीस काय शोधत होते? सोबतच त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील केली आणि जाती वाचक भाषेत देखील त्यांना प्रश्न विचारले.चौकशीच्या नावाखाली मुलींना जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करणे
हे कोथरूड पोलिसांची वर्तन निश्चित च निषेधार्थ आहे. कोथरुड पोलिसांसोबत आलेला पीडित तरुणीच्या नातेवाईकांपैकी एकजण संभाजीनगरमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी आहे. या अधिकाऱ्याने कोथरुड पोलिसांच्या मदतीने या सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या मुलींना ताब्यात घेतले अन् मारहाण केली. कोथरुड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस प्रेमा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोथरुडमध्ये राहणाऱ्या तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांच्या रुमवर जाऊन झडती घेतली. तसेच त्यांना एका छोट्या खोलीत नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या मुलींनी या पोलिसांना आयडेंटिटी विचारली असता या पोलिसांनी थेट कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तुम्हाला तिथे सगळं सांगतो असं म्हणत थेट पोलीस स्टेशनमध्ये नेलं. त्यांना तिथे मारहाण केली. त्यांच्यासोबत पुन्हा एकदा वेगवेगळ्या पद्धतीची विचारणा केली आणि या सगळ्यांमुळेच या तिन्ही मुली आता मोठ्या धक्क्यात आहेत. या पोलिसांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी अजूनही गुन्हा नोंद न झाल्यामुळे या मुली आणि त्यांचे सहकारी काही प्रमाणात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

“तूम्ही महार-मांगाचे आहात मग असेच वागाल? तुम्ही सगळे LGBT आहात का?” अशी भाषा पोलिसांनी वापरली. शनिवारी पाच तास या मुली पोलिसांच्या ताब्यात होत्या. रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आले, असा आरोप पिडीत मुलींच्या मैत्रिणीने केला आहे. यासंबंधीचा व्हिडिओ श्वेता एस. पाटील नावाच्या एका तरुणीने फेसबुक वरुन शेअर केला.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे. या मुली दलित आहेत म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली, असा आरोप तिने केला आहे.
पुणे पोलीस आयुक्त संवेदनशील आहेत का…... याप्रकरणी या मुली आणि त्यांचे काही सहकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांनी थेट पोलिसांकडेच दाद मागायला सुरुवात केली आहे. मात्र, पोलिसांकडनं कोणतीही दाद मिळत नसल्याचा आरोप देखील याच मुलींच्या सहकाऱ्यांनी केला आहे. पुणे पोलीस आयुक्त असू देत किंवा कोणी पोलीस उपायुक्त या सगळ्यांशी संपर्क साधला तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्याची मागणी या सगळ्यांनी केली आहे. मात्र पोलिसांनी अजूनही या सगळ्यांना दाद दिली नसल्याचे ते म्हणतात.
या सगळ्या प्रकारामुळे त्यांना मोठा धक्का बसलाय आहे. यांच्या विरोधात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पीडित मुलींपैकी दोन मुलींची मानसिक अवस्था ठीक नाही.
पुणे पोलिसांच्या अंगलट येणाऱ्या या प्रकरणातुन पुणे पोलीस बचावाचा मार्ग शोधत आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी फोनवर बोलताना सांगितले, 3 मुलींच्या तक्रारीवरुन आधी चौकशी करतो आणि त्याच तत्थ्य आढळल्यास आम्ही FIR करु असे या मुलीला व त्यांच्या सहकाऱ्यांना फोनवर सांगितले यावरुन पोलीस आयुक्त महिलांच्या बाबतीत संवेदनशील नसल्याचे दिसते. एकीकडे महाराष्ट्र सरकार लाडकी बहिण योजना आणते मग ह्या मुली सरकारच्या लाडक्या बहीणी नाहीत का? पुणे बसस्टाप महीला रेपप्रकरणी जेवढी तत्परता पुणे पोलिसांनी दाखवली आज ती तत्परता कुठे गेली. इथे पुणे पोलिस च आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. आज या मुलीकडुन FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी सकाळी 11 वाजतापासून पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते बसले पण त्यांना निराशा हाती लागली.
अशावेळी पुणे व मुंबई तील प्रसिद्ध राजकारणी नेते सामाजिक कार्यकर्ते गप्प का? इथे 3 तरुणींना लाथाबुक्क्यांनी मारहाण होते अश्लील व जातीवाचक शिवीगाळ होते तिथे दलित महिला असतांना ॲट्रॉसिटीचा गुन्हा पुणे पोलीस दाखल करीत नाही तर BNS च्या नविन कायद्यानुसार तक्रार घेतो असे म्हणतात. अल्पवयीन मुलींबाबत पोस्को कायदा व अत्याचारग्स्त तरुणी ह्या दलित महिला असल्याने इथे आधी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणे प्रभावशाली ठरतो पण पोलीस हे त्यातून पळवाटा काढण्यासाठी बी एन एस कायद्याचा आधार घेत आहेत. हे चुकीचे आहे.

































