श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला नगरपंचायत /नागपुर: 8 जानेवारी 2026
महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे ग्रृहक्षेत्र असलेल्या महादुला नगरपंचायत मध्ये बावनकुळेंच्या नेत्रृत्वात तिसऱ्यांदा विजय मिळवित भाजप ने एकहाती सत्ता मिळवली. महादुला नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे 11 नगरसेवक व एक नगराध्यक्ष निवडुन आला.
भाजप गटनेता पदी अभिजीत ढेंगरे यांची झाली सर्वानुमते निवड
11 नगरसेवकांनी नगरपंचायतीत गटनेता पदी अभिजित ढेंगरे यांची सर्वानुमते निवड केली. अभिजीत सुभाष ढेंगरे हे प्रभाग क्रमांक 2 मधुन 12 मतांनी विजयी झाले होते. अभिजीत ढेंगरे यांची गटनेता पदी निवड झाल्यानंतर आता उपाध्यक्ष पदी कुणाची वर्णी लागणार? याकडे आता उत्सुकता लागली आहे. नगराध्यक्षपदी हेमलता सावजी यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर आता एखाद्या महिला नगरसेविकेची उपाध्यक्ष पदी निवड होण्याची शक्यता नाही असेही बोलले जात आहे.
उपाध्यक्ष पदी मित्रपक्षाला लाँटरी लागते की कांग्रेसच्या एखाद्या आयात केलेल्या नगरसेवकास उपाध्यक्ष पद मिळणार?
भाजप-शिवसेना (शिंदे) महायुती चे शिवसेना पक्षाचे सचिन वानखेडे यांना उपाध्यक्ष बनविण्याची जोरात चर्चा सुरू आहे. परंतु त्याचबरोबर उपाध्यक्ष पदासाठी कांग्रेस च्या एका नगरसेवकाच्या नावाची चर्चा आहे. कांग्रेसचे 5 नगरसेवक निवडून आले आहेत परंतु गट रजिस्टर्ड करण्यासाठी एक नगरसेवक अजुनही कांग्रेस च्या गोटात जात नसल्याचे बोलले जात आहे. त्या नगरसेवकाच्या नाराजी मुळे तो नगरसेवक भाजपच्या गळाला लागला तर नाही ना? कदाचित जर हा नगरसेवक भाजपच्या गोटात गेल्यास त्याची सुद्धा उपाध्यक्ष पदी वर्णी लागु शकते.
भाजप नेता चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत होणार अध्यक्ष, उपाध्यक्ष गटनेता पदग्रहण समारंभ
सध्या महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचा धडाक्यात प्रचार सुरू असुन भाजप नेता चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपा चे स्टार प्रचारक असुन संपुर्ण राज्यभर त्यांच्या प्रचारसभा असल्याने सध्या ते महादुला नगरपंचायत मधील नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व गटनेता पदग्रहण समारंभास उपस्थित राहू शकणार नाही. 12 तारखेपर्यंत महसुलमंत्री बावनकुळेंच्या प्रचार सभांचा धडाका असुन 13 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस कार्यक्रम सुद्धा कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात असतो. 14 जानेवारी ला कदाचित तीळसंक्रातीच्या दिवशी महादुला भाजप ला गोड बातमी देऊ शकतात असे म्हटले जाते.




































