वडेट्टीवारांनी संभ्रम दूर करावेत
श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
मुंबई, दि.11 आँक्टोबर 2025
शासनाने 2 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जीआर हा हैदराबाद गैजेटपुरता मर्यादीत असुन ओबीसी आरक्षण विषयी बोलतांना माथी भडकाऊ नका असा इशारा महसूल मंत्री तथा ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची दिला. पण हा इशारा नेमका कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांना दिला असल्याची राजकीय गोटात चर्चा आहे. कारण काल नागपुरात झालेल्या ओबीसी महामोर्चात विजय वडेट्टीवार यांनी जरांगेच्या नादाला लागुन ओबीसींना संपविण्यासाठी फडणवीस सरकारने कारस्थान रचल्याचा आरोप केला तसेच नुकत्याच झालेल्या शासकीय नोकरभर्ती मध्ये विदर्भातील ओबीसी युवकांच्या नोकऱ्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील युवकांनी कुणबी प्रमाणपत्र व आरक्षणाच्या माध्यमातून पळवल्या असा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा इशारा दिला असावा.
ते पुढे म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही,आमचे सरकार ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, याची खात्री बाळगा असा विश्वास महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा व कुणबी मराठासंदर्भातील काढलेल्या शासन आदेशावरून सर्वपक्षीय शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही. सरकार ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आश्वासन दिले आहे. कुणबी प्रमाणपत्रांबाबत समाजात संभ्रम आहे की बोगस प्रमाणपत्रे निघतील. मी खात्री देतो की, जे खऱ्या अर्थाने पात्र कुणबी मराठा आहेत, केवळ त्यांनाच प्रमाणपत्रे मिळतील. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संभ्रम दूर करून घ्यावेत. सरकारकडून काहीही चुकीचे होणार नाही, समितीचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः व सरकार याबाबत काळजी घेईल.” असे बावनकुळे यांच्या RM Media सोशल मीडिया ग्रुप च्या प्रेसनोटच्या माध्यमातुन कळविले आहे.






































