श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नागपुर : 8 आँक्टोबर 2025
Jhund Movie:प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या “झुंड” चित्रपटात भूमिका साकारलेल्या प्रियांशु उर्फ बाबू छत्रीय नामक तरुण अभिनेत्याची आज नागपुरातील खून झाला आहे. नागपूरच्या जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारा या भागात ही घटना घडली. बाबू छत्रीचा मित्र ध्रुव साहू याने त्याचा खून केल्याचं पोलिसांनी सांगितले.

बॉलिवूडच्या ‘झुंड’ या चर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा तरुण कलाकार प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची निर्घृण हत्या झाल्याने नागपूर शहर हादरले आहे. मंगळवारी मध्यरात्री नारा परिसरात घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याचाच मित्र धूप शाहू याला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशु क्षत्रिय हा मंगळवारी रात्री आपल्या मित्र धूप शाहूसोबत बाहेर गेला होता. रात्री उशिरा नारा परिसरातील काही नागरिकांना तो वायरने बांधलेला, गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर चाकूचे अनेक वार होते. नागरिकांनी तत्काळ जरीपटका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रियांशुला मेयो रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटात प्रियांशुने झोपडपट्टीत राहणाऱ्या तरुणांच्या संघर्षमय आयुष्याचं वास्तवदर्शी चित्रण केलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिकेतील या चित्रपटाने समाजातील वंचित घटकांना आवाज दिला होता. प्रियांशुचं पात्र या चित्रपटातील वास्तव आणि भावनिकतेसाठी विशेष लक्षात राहिले.



































