श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
कोराडी /नागपूर:19 एप्रिल 2025
काल रात्री 12:30 वाजता सिद्धार्थ नगर, इंदिरा प्रगती नगर, मच्छी मार्केट, फुले नगर परिसरात एक फेज ची लाईट गोल झाली. मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याच्या भीषण उकाड्याचा व गर्मीचा नागरिक सामना करीत आहेत. दोन फेजची लाईट सुरु असतांना एक फेज गेला. दरम्यान या भागातील महावितरण च्या लाईनमन यांना नागरिकांनी फोन लावला असता लाईनमन यांनी आपापले फोन बंद करुन ठेवलेले होते. अशातच नागरिकांनी महावितरण च्या सहायक अभियंता कार्यालय महादुला येथे भेट दिली तेव्हा कार्यालयाला टाळे लागले होते.
मग नागरिकांनी VANSH NEWS Digital web portal चैनल चे मुख्य संपादक सुनील साळवे यांच्या घरी धाव घेतली. तेव्हा सुनील साळवे यांनी सहाय्यक अभियंता खवसे जी यांना मोबाईल द्वारे सुचना दिली असता त्यांनी लाईनमन यांना पाठवुन त्वरित लाईट सुरु करतो सांगितले. परंतु 3 तास झाले तरी कोणी लाईनमन या परिसरात भटकला नाही.सहाय्यक अभियंता खवसेजी यांना परत सुनील साळवे यांनी फोन केला असता सहायक अभियंता खवसे जी यांचा सुद्धा मोबाईल स्वीच ऑफ दाखवला. यावरुन महिवितरण कोराडी येथील लाईनमन व सहाय्यक अभियंता यांची कर्तव्यात दिरंगाई दिसुन आली. विद्युत सेवा ही अतिआवश्यक सेवेत येत असुन महावितरण चे कर्मचारी हे हलगर्जीपणा करतांना दिसतात.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ता महावितरण चे कर्मचारी
नागपूर चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे कर्मचारी /नातेवाईक /कार्यकर्ते हे कोराडी विभागातच एकाच ठिकाणी मागील 10 वर्षापासून कायमस्वरूपी नोकरीवर कसे? असा सवाल आता येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. काही लाईनमन हे फक्त आपल्या कार्यालयात जाऊन रजिस्टर वर स्वाक्षरी करतात परंतु त्यानंतर ते त्यांच्या कर्तव्यावर गैरहजर राहतात. काहींनी तर आपल्या हाताखाली कंत्राटी अस्थायी कामगार ठेवले आहेत खांबावर चढुन वीजेची जोडणी करतांना शासकीय कर्मचारी दिसत नाही. परंतु त्यांच्या जागी अस्थायी कामगार ठेवल्याची खात्रीलायक माहिती पुढे येत आहे. काही लाईनमन तर भाजप च्या प्रोग्राम मध्ये पालकमंत्री तथा महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्याला खांदा लावून भाजपचा प्रचार करतात हे नियमबाह्य आहे. अशा कर्तव्यात कसुर करणाऱ्या महावितरण च्या कर्मचारी यांची कोराडी विभागातून अतिताक्काळ एक तर हकालपट्टी करावी किंवा त्यांची नागपुर ग्रामीण च्या रामटेक /काटोल /बुटीबोरी /उयरेड च्या दुर्गम भागात करावी अशी मागणी आता जनतेने महावितरण च्या वरिष्ठ अधिकारी यांना केली आहे.
एकीकडे इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी ची द्वितीय सत्रांत (शेवटची) परिक्षा चे पेपर सुरु असतांना महादुला-कोराडी येथे वीजेचा लपंडाव आणि रात्रभर गर्मीचा नागरिकांना विद्यार्थ्यांना काल रात्रभर त्रास सहन करावा लागला त्यामुळे रात्री मच्छरांच्या प्रकोपामुळे रात्री झोप न झाल्याने विद्यार्थी सकाळी 7 वाजता शाळेत जाऊ शकले नाही व पेपर सुद्धा देऊ शकले नाहीत. याची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिताक्काळ दखल घेतली पाहिजे अशा कामचुकार अधिकारी कर्मचारी यांचेवर कर्तव्यात कसूर केल्यामुळे अतिताक्काळ कारवाई करण्याची व त्यांची बदली करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
