भविष्यात कधीच विमानात बसणार नाही – आर्यन
श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital media services
अहमदाबाद /गुजरात: 15 जुन 2025
दोन दिवसांपुर्वी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, विमान कोसळण्याचा अचुक टायमिंग साधत मोबाईल वर व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या 12 वी शिकत असलेल्या युवकाने चांगलीच धास्ती घेतली आहे. या विमान अपघातात आतापर्यंत 275 मृत्यू झाले आहेत. या विमान अपघातामागे घातपात होता का, याची चौकशी तपास यंत्रणा करत आहेत. यामुळे हा व्हिडीओ नेमका त्याचवेळी कसा काढला, , यावरही पोलिसांना संशय होता, यामुळे हा व्हिडीओ काढणाऱ्या 17 वर्षांच्या तरुणाची पोलिसांनी काल चौकशी केली.


आर्यनने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपण खूप घाबरलो असल्याचे म्हटले आहे, तसेच आयुष्यात कधीच विमानात बसणार नसल्याचे त्याने म्हटले आहे. आर्यनने त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ 1:39 वाजता रेकॉर्ड केला होता. त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओची हीच वेळ दिसत आहे.
आर्यन हा आपल्या नातेवाईकांकडे आला होता. त्याने यापूर्वी एवढ्या जवळून कधीच विमान पाहिलेले नव्हते. ज्या मेघानीनगरमध्ये विमान कोसळले त्या भागात त्याचे नातेवाईक राहतात. त्याने आपल्या मित्रांना विडियो दाखविण्याच्या उद्देशाने या विमानाचा व्हिडीओ काढला होता. यावेळी त्याला ते विमान पुढे जाऊन कोसळले याची काहीच कल्पना नव्हती. परंतू, त्याला पोलीस चौकशीला सामोरे जावे लागले आहे.
आर्यन पहिल्यांदाच शहरात आला होता, तो गावी असतो असे त्याच्या बहिणीने सांगितले. एवढ्या खालून विमान जाताना पाहून त्याने त्याचा व्हिडीओ काढला. त्याच्या शहरातील घरावरून विमाने उडत असल्याचे त्याला गावातील त्याच्या मित्रांना सांगायचे होते. त्यानेही कधी एवढ्या जवळून विमान पाहिलेले नव्हते, असे त्याच्या बहिणीने सांगितले.
या व्हिडीओची स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. पोलिसांनी या घटनेचा व्हिडीओ बनविला म्हणून कोणाला अटक केली नसल्याचे सांगितले आहे. पोलीस उपायुक्त (गुन्हे) अजय पाल शर्मा यांनी सांगितले की, आर्यनला अटक करण्यात आलेली नाही. त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. व्हिडीओ बनविणाऱ्या तरुणाने या व्हिडीओची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याला आम्ही एक साक्षीदार म्हणून त्याच्या वडिलांसोबत बोलविले होते. चौकशी करून त्याला परत पाठविले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पण एखाद्या घटनेचा अचुक विडिओ बनवताऱ्या युवकाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. लोकशाही त सत्य बोलणे, सत्य लिहिणे व सत्य दाखवणे हा जरी प्रत्येक नागरिकांना मुलभूत अधिकार आहे परंतु सध्या देशात लोकशाही राहिलेले नाही. सत्य बोलणाऱ्या व दाखवणाऱ्या व्यक्तीस /पत्रकारांना समाजद्रोही /समाजकंटक ठरविले जात आहे. त्यामुळे आर्यन ला गुजरात पोलिसांच्या चौकशी चा दररोज आता सामना करावा लागणार हे मात्र निश्चित आहे! सरकारच्या चुका आणि जनप्रतिनिधी यांचा भ्रष्टाचार पुढे आणणाऱ्यांच्या मागे विरोधी राजकीय पक्षांनी आता खंबीरपणे उभे राहण्याची व त्यांना कायदेशीर मदत ही देण्याची गरज आहे.
