श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital media services
कामठी /नागपुर: 15 जुन 2025
नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी ते ड्रैगन पैलेस टेंपल व विविध शैक्षणिक संस्था यांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण उड्डाणपुल असुन रमानगर रेल्वे क्रॉसिंग येथील उड्डाणपुलाचे काम मागील 5 वर्षापासून रखडले होते. या कामाचे टेंडर अभी इंजिनियरिंग कंपनी चे विजयवर्गीय यांना मिळाले होते. या कामासंदर्भात अनेक तक्रारी माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वारंवार येत होत्या. उड्डाणपुलाचे काम व्यवस्थित व्हावे व जनतेला हा मार्ग लवकरात लवकर खुला व्हावा यासाठी मागील काही वर्षांपासून माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे ह्या सातत्याने पाठपुरावा करीत होत्या. कंत्राटदार विजयवर्गीय यांना रेल्वे प्रशासधाकडुन 4-5 तासांचा मेगाब्लॉक मिळत नव्हता. येथे गर्डर ब्रिज टाकणे कठीण होत चालले होते.
कंत्राटदार विजयवर्गिय यांचे विनंतीवरून सुलेखाताई कुंभारे यांनी रवीनगर नागपुर येथे लोककर्म विभाग व रेल्वे विभागाच्या अधिकारी व कंत्राटदार यांचे सोबत 31 मे 2025 रोजी बैठक घेत चर्चा केली तसेच विविध तांत्रिक अडचणी समजुन घेत रमानगर येथे रेल्वे विभागातर्फे मंजुरी घेऊन 4-5 तासांचा मेगाब्लॉक घेण्याच्या सूचना रेल्वे विभागाचे अधिकारी यांना केली. माजी राज्यमंत्री रवीभवन नागपुर येथे झालेल्या बैठकीत रेल्वे विभागातर्फे शशांक कुलश्रेष्ठ,लोककर्म विभागाचे जनबंधु आणि स्थानिक कंत्राटदार विजयवर्गिय माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांच्या सोबतच्या बैठकीत उपस्थित होते.

त्यानुसार 12 जुन व 13 जुन ला रमानगर येथे गर्डर ब्रिज टाकण्याची तयारी झाली. परंतु मेगाब्लॉक मिळाला नाही. काल रात्री 4-5 तासांचा मेगाब्लॉक मिळाल्यानंतर येथे गर्डर ब्रिज बसविण्यात आला.
रमानगर येथे रेल्वे क्रॉसिंग वर गर्डर ब्रिज बसविण्यासाठी रेल्वे विभागाने 4-5 तासांचा मेगाब्लॉक दिल्याबद्दल रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांचे सुलेखाताई कुंभारे यांनी आभार व्यक्त केले.
राजकारणात कोणतेही पद नसतांना जनतेच्या समस्या निरंतर सोडविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सुलेखाताई कुंभारे यांचे अथक परिश्रम निश्चित च वाखाणण्याजोगे आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रैगन पैलेस टेंपल येथे लाखोंच्या संख्येने लोक कामठीला येतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुढील दोन महिन्यात उड्डाणपुलाचे काम पुर्ण करावे अशा सुचना कंत्राटदार अभी इंजिनियरिंग कंपनी चे विजयवर्गिय यांना सुलेखाताई कुंभारे यांनी दिल्या.


आज सकाळी सुलेखाताई कुंभारे यांनी रमानगर येथे गर्डर ब्रिज बसविण्याच्या कामाचा झालेल्या कामाचा आढावा घेतला हे विशेष.लवकरच रमानगर उड्डाणपुलाचे जनतेसाठी लोकार्पण करण्यात येईल असा विश्वास सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केला.
