श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
कोराडी/ नागपूर: 23 मार्च 2025
शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना नोकरीचा प्रारंभदिवस जितका महत्त्वाचा असतो तितकाच निवृत्तीचा दिवसदेखील महत्त्वाचा असतो. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोराडी(महाजेनको) जिल्हा – नागपूर मधील इलेक्ट्रिक मेन्टेनन्स विभागात उप कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत असलेल्या सौ. माधवी विवेकानंद जांभूळकर 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या. मुख्य अभियंता महानिर्मिती विलास मोटघरे यांनी त्यांचा 28 फेब्रुवारी रोजी सत्कार केला.

सौ. माधवी जांभुळकर ह्या शासकीय सेवेसोबतच सामाजिक,धार्मिक कार्यक्रमांत ही हिरीरीने भाग घेतात. फुले, शाहू आंबेडकरी चळवळीसाठी त्यांनी पे बैक टु सोसाइटी साठी त्या आजही झटत आहेत.
सौ.माधवी जांभूळकर यांची सन 1991 ला कोराडी औष्णिक विद्युत केंद्र मध्ये दुय्यम अभियंता या पदावर नियुक्ती झाली होती आणि त्या उप कार्यकारी अभियंता या पदावर सेवानिवृत झाल्या.कार्यरत असताना त्यांनी इलेक्ट्रिकल मेंटेनन्स विभागात येणाऱ्या सर्व तक्रारीची तात्काळ दखल घेणे आदी कर्तव्यानिष्ठ भावनेने सेवा केली. कॉन्फेरंस हॉल कोराडी थर्मल पॉवर स्टेशन 660 मेगा वॉट मध्ये 28 फेब्रुवारी ला झालेल्या गौरव समारंभात मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पवृक्ष देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला उप मुख्य. अभियंता कसोलकर , उप मुख्य. अभियंता दिगवेकर , उप मुख्य.अभियंता इंगळे , कल्याण अधिकारी मेंढेकर साहेब, विभाग प्रमुख आणि बराच मोठा कर्मचारी वर्ग उपस्थित होता .

