श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
मौदा /नागपुर : 8 जानेवारी 2026
नागपुर जिल्ह्यातील कामठी विधानसभेत असलेल्या मौदा नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदाचा छोटेखानी पदग्रहण सोहळा आज पार पडला.
नुकत्याच झालेल्या मौदा नगर पंचायत च्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप चे प्रसन्ना (राजाभाऊ) तिडके यांचा विजय झाला होता. या निवडणुकीत काँग्रेस चे राजेश निनावे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण केव्हा होईल याची उत्सुकता होती. भाजप नेते तथा महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळें हे सध्या नगरपालिका निवडणुक प्रचारात व्यस्त असल्याने ते आज झालेल्या पदग्रहण समारंभात उपस्थित राहु शकले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे 15 जानेवारी 2026 ला मौदा नगरपंचायत येथे मोठ्या कार्यक्रमात उपस्थित राहु शकतात.

आज झालेल्या पदग्रहण समारंभात
टेकचंद सावरकर (माजी आमदार, कामठी–मौदा विधानसभा क्षेत्र), सौ. निशा सावरकर (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष),संकेत चंद्रशेखर बावनकुळे (युवा नेते),
शिवराज बाबा गुजर (सरचिटणीस – राष्ट्रवादी काँग्रेस),मुकेश अग्रवाल (तालुका अध्यक्ष, भाजपा),सौ. भारती सोमनाथे (माजी नगराध्यक्ष), खुशाल तांबडे (उपसभापती – कृषी उत्पन्न बाजार समिती, मौदा)तसेच डॉ. विवेक मेश्राम (मुख्याधिकारी – नगर पंचायत, मौदा) आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आज नगर पंचायत मौदा येथे नगराध्यक्ष पदाचा पदभार भाजप चे प्रसन्ना (राजाभाऊ) तिडके यांनी स्वीकारला.

यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक राजकुमार सोमनाथे, उमेश गभणे, मोरेश्वर सोरते, रमेश कुंभलकर,सौ. पद्मावती जॉनी चलसानी, दीपिका चंद्रकांत पोटभरे, चांगोजी तिजारे, डॉ. नीलिमा घाटोळे, मानिरांजी यादव, सौ. प्रिया प्रसन्ना तिडके, राजेंद्र जैस्वाल, सौ. कल्पना मानकर, प्रमोद ठाकरे,दिलीप शिरसाम, प्रकाश येळणे, शंकर केळवदे, सौ. वर्षा मरघडे,राहुल पोटभरे, राहुल हटवार, देवराव करडभाजणे,धनराज चाफले, संजय मदनकर, वैशाली चव्हाण आदींची उपस्थिती होती.




































