श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी /नागपुर :28 आँक्टोबर 2025
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आलेल्या विविध योजना राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या महिला सक्षम नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या भिलगाव ग्रा. पं. च्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ. भावना चंद्रकांत फलके तसेच खैरी ग्रा. पं. च्या सरपंचा सौ. योगिता किशोर धांडे यांना अखिल भारतीय सरपंच संघठनेतर्फे नुकतेच पुणे येथील लोणावळा येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
अखिल भारतीय सरपंच संगठनेचे अध्यक्ष जयंत पाटील और महाराष्ट्र राज्य संगठनेचे विविध पदाधिकारी यांच्या हस्ते राज्यातील हा महत्वपूर्ण प्रतिष्ठित पुरस्कार सौ.भावना चंद्रकांत फलके (सरपंचा – भिलगांव) व सौ. योगिता किशोर धांडे (सरपंच – खैरी) यांना प्रदान करण्यात आला. गावातील सर्वांगीण विकासासाठी त्यांच्याद्वारे करण्यात आलेले अथक परिश्रम, पारदर्शी प्रशासन, महिला सशक्तिकरण, स्वच्छता अभियानात सक्रिय भागीदारी, ग्राम निधी चा सदुपयोग आणि विकासासाठी नवनवीन कल्पना प्रयोग यामुळे महिलामधुन उत्क्रृष्ट नेत्रृत्व नागपुरच्या ग्रामीण भागात पुढे आले आहे. सध्या कामठी तालुक्यातील भिलगाव व खैरी ग्रा. पं. च्या विकासाची गती बघता नागपूर शहराच्या बरोबरीत हे दोन्ही गाव वाढत्या लोकसंख्येसोबत उत्क्रृष्ट ग्रामस्वच्छता, शुद्ध पेयजल, सोलर स्ट्रीट लाईट, ग्रामअंतर्गत रस्तेविकास,विविध घरकुल योजना, तंटामुक्ती, सामाजिक व धार्मिक सौहार्द यांसाठी भिलगाव सरपंच भावना फलके व खैरी सरपंच सौ. योगिता धांडे यांच्या द्वारा सातत्यपूर्ण कामगिरी बघता त्यांचा झालेल्या सत्कारामुळे दोन्ही गावात हर्षोल्लासाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





































