शांतता भंग व तेढ निर्माण होण्याची शक्यता?
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Webportal online
बेरळा / हिंगोली : 8 सप्टेंबर 2025
हिंगोली जिल्ह्य़ातील औंढा तालुक्यात असलेल्या बेरुळा या गावात मागील काही वर्षांआधी गावाबाहेर असलेल्या शासकीय जागेवर येथील बौद्ध समाजाने नीळा झेंडा उभारला .दरवर्षी भीम जयंतीनिमित्त मिरवणूक काढतात. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावातील सर्व बौद्ध, मराठा,मातंग समाज सहभागी होऊन मिरवणूक काढतात. बेरुळा गावात कधीच आपापसात जातीय तणाव निर्माण झाली नाही.
परंतु यावर्षी अण्णाभाऊ साठे जयंतीआधी येथील मातंग समाजातील काही युवकांची माथी भडकावून बौद्ध समाजाने रोखलेल्या झेंड्याच्या शेजारीच पिवळा झेंडा उभारण्याचा काही जातीयवादी राजकारण्यांनी डाव रचला.बेरुळा गावातील काही राजकारणी व बाहेरील बड्या नेत्यांनी षडयंत्र रचून बौद्ध व मातंग समाजात आपसी तणाव निर्माण केला.सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या भागातील एका मराठा आमदाराने बेरुळा गावात बौद्ध व मातंग समाजात तेढ निर्माण होण्याच्या उद्देशाने तहसीलदार औंढा नागनाथ यांना सांगून दि.5 आँगष्ट 2025 रोजी औंढा पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीत बेरुळा गावातील बौद्ध समाजाने उभारलेला नीळा झेंडा कोणाचीही तक्रार नसतांना व कोणतीही पुर्वसुचना न देता जेसीबी ने उखाडला.मुख्य मार्गावर झेंडा उभारल्याचा व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप ठेवत येथील बौद्ध व मातंग समाजातील प्रत्येकी 8-8 युवकांवर गुन्हा दाखल केला अशी चर्चा आहे.


एकीकडे औंढा नागनाथ तहसीलदार व पोलीस प्रशासनाविरुद्ध बेरुळा गावातील बौद्ध उपासक व उपासिका यांनी दि.6 सप्टेंबर 2025 पासून बेरुळा ते हिंगोली लाँग मार्च व बिऱ्हाड आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू केले असतांनाच बेरुळा गावातील काही मराठा युवकांनी त्या वादग्रस्त जागेवर भगवा झेंडा काल उभारल्याने गावात आता बौद्ध- मातंग- मराठा हा तिहेरी संघर्ष होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
बौद्ध व मातंग समाजात आधी भांडणे लावली आता त्यांचे झेंडे काढुन आता आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा येथील मराठा आमदार खासदार यांचा डाव असल्याचा बेरुळा येथील बौद्ध बांधवांचा आरोप आहे.येथील प्रशासन इतके गाफील कसे? त्या वादग्रस्त जागेवर नव्याने भगवा झेंडा मराठा युवकांनी लावलाच कसा? या मराठा युवकास कोणाची फुस आहे हे आता जनतेपुढे आले पाहिजे.आता औंढा नागनाथ तहसीलदार व औंढा पोलीस मराठा युवकांनी नव्याने उभारलेला भगवा झेंडा जेसीबी ने उखडून काढणे ही त्यांची जबाबदारी आहे अन्यधा बेरुळा गावात पुन्हा एकदा शांतता भंग होऊ शकते.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तहसीलदार औंढा काय पाऊल उचलतात? याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.



































