श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर : 6 डिसेंबर 2025
संपुर्ण जगात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा म्रृत्यु दिवस 6 डिसेंबर हा “महापरिनिर्वाण दिन” म्हणून साजरा केला जातो. संपुर्ण जगात जवळपास 5 लाखापेक्षा जास्त आंबेडकर अनुयायी हे मुंबई च्या चैत्यभुमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अखेरचा निरोप द्यायला गोळा झाले होते. मुंबईत मोठा जनसागर उलटला होता बाबासाहेबांप्रति क्रृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. आज संपुर्ण जगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात येते. परंतु भाजप चे नेते नेमके केव्हा काय करतील याचा नेम नाही.. याचे आजचे उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन नागपुरच्या कामठी विधानसभेतील भाजप चे माजी आ. टेकचंद सावरकर यांनी साजरा केला.. महापरीनिर्वाण दिन हा साजरा करत नसतात. याचे भाजप चे माजी आ. टेकचंद सावरकर यांना भान राहिले नाही बहुधा.

आपण आपल्या घरातील आपले नातेवाईक म्रृत पावल्यावर त्यांच्या पुण्यतिथी लाख उत्सव म्हणून कधी साजरा करतो काय? बिल्कुल नाही. आपण यादिवशी दुःखी मनाने त्या म्रृत व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देतो. त्यांच्या सत्कर्माची आठवण ठेवत त्यांचे विचार आपल्या जीवनात अंगिकारतो. परंतु भाजप चे माजी आ. टेकचंद सावरकर यांनी आज त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरुन ग्रा. पं. धानला ता. मौदा येथील कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन साजरा केला अशी पोस्ट करतात यावरुन त्यांच्या बुद्धीची कीव येते. 6 डिसेंबर हा दिवस उत्सव नाही साजरा करायला. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी श्रद्धांजली अर्पण करण्याचा /अभिवादन करण्याचा दिवस असतांना भाजपचे माजी आ. टेकचंद सावरकर यांनी 6 डिसेंबर ला महापरिनिर्वाण दिन हा साजरा केला अशी पोस्ट टाकतात. त्यामुळे कामठी मौदा विधानसभेत भाजप आ. टेकचंद सावरकर यांच्यावर संताप व्यक्त होत आहे. भाजप आ. टेकचंद सावरकर यांनी यांवर अतितातकाळ सोशल मीडिया च्या माध्यमातून आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून सार्वजनिक रित्या माफी मागावी अशी मागणी होत आहे.
‘पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन’ म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदराने आणि नम्रपणे श्रद्धांजली अर्पण करणे किंवा आठवणे, ज्यात त्यांच्या कार्याला सलाम करणे आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देणे समाविष्ट आहे.
स्मरण आणि आदर: ज्या दिवशी व्यक्तीचे निधन झाले, ती तिथी दरवर्षी साजरी केली जाते, ज्यात त्यांना आदरांजली अर्पण करतात.
थोडक्यात, पुण्यतिथी म्हणजे दुःखापेक्षा जास्त, आदर, स्मरण आणि शिकवणीचे पुनरुज्जीवन करण्याचा दिवस असतो, असे मानले जाते.
भाजप आ. टेकचंद सावरकर हे तेच भाजप चे नेते आहेत ज्यांना भाजप ने 2019 ला कामठीतुन भाजप ची उमेदवारी दिली होती. कामठीतुन 3 वेळ आमदार राहिलेल्या व कैबिनेट मंत्री राहिलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांची तिकिट भाजप नेत्यांनी कापली व टेकचंद सावरकर यांना लाँटरी लागली. आज त्याच भाजप चे आ. टेकचंद सावरकर यांना पुण्यतिथी साजरी करतात हा शोध कसा लागला हा जनतेचा प्रश्न आहे. काय टेकचंद सावरकर हे त्यांच्या घरातील म्रृतकांच्या पुण्यतिथ्या उत्सवासारखे साजरा तर करीत नसतील ना? भाजप चे माजी आ. टेकचंद सावरकर हे या निमित्ताने आपली चुक दुरुस्त करतात काय? याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.
































