वाढदिवस अभिष्टचिंतन – 13 जानेवारी
(विशेष अग्रलेख-श्री. सुनील उत्तमराव साळवे – Mob. No. 9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या खसाळा या गावचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे आजोबा खुमानराव व वडील क्रृष्णराव बावनकुळे यांची शेती कोराडी वीज प्रकल्पात गेली होती.लहानपणीच ते त्यांचे मामा बरडे यांच्या कडे जुनी कोराडी गावात राहायला आले. त्यांचे माध्यमिक शिक्षण सेवानंद विद्यालय महादुला येथे तर 12 सायन्स विद्यामंदिर ज्यु. काँलेज येथे झाले त्यानंतर त्यांनी धरमपेठ विज्ञान काँलेज येथे बी.एस.सी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला. रोजगाराचे दुसरे साधन नसल्याने त्यांनी कोराडी येथे येऊन रोजगारासाठी प्रयत्न केले. त्यातच त्यांना ऑटो चालवून स्वयंरोजगार करण्याचा मार्ग सुचला. काही काळ यानी ऑटो चालविण्याचे काम केले. त्यातून त्यांचा जनसंपर्क वाढला. प्रकल्पात शेती व घरे गेलेल्या प्रकल्पग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालविले. छत्रपती सेना चे अध्यक्ष या नात्याने प्रकल्पग्रस्तांना एकत्र करीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1990 मध्ये आंदोलने उभारली. उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार म्हणून त्यांनी कोराडी वीज केंद्रात कामही सुरू केले. 1990 मध्ये त्यांनी प्रेमविवाह केला. याबाबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी वेळोवेळी त्यांच्या भाषणात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आटो चालवण्याचा व प्रेमविवाह चा उल्लेख केला हे विशेष. नागपुर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेल्या सिंदी उमरी गावची ज्योती श्रीधर बोंदरे त्यांच्या जीवनात अर्धांगिनी म्हणून आली आणि बावनकुळेंच्या जीवनातील अंधार दुर करण्यात सावलीसारखी सोबत राहिली.


प्रकल्पग्रस्तांसाठी केलेले रास्ता रोको व जेलभरो आंदोलन ठरले बावनकुळेंच्या राजकीय जीवनात टर्निंग पाँईट. एका खेडेगावात शेतकरी कुटुंबात जन्म. अशा कुटुंबात जन्मल्यावर जी आर्थिक आव्हाने असतात ती आ वासून उभीच होती. अशातच दोन वेळचे अन्न देणारी शेतीही वीज प्रकल्पात गेली. उदरनिर्वाहासाठी शेतमजुरी केली, अखेर ऑटोचे स्टेअरिंग हातात घेतले. किरायाच्या घरात राहून जीवनाचा गाडा पुढे रेटला. परंतु सामाजिक विकासाची तळमळ मनात कायमच होती. 1996-97 मध्ये प्रकल्पग्रस्तांना कोराडी वीज केंद्रांत नोकरी मिळावी यासाठी केलेले रास्ता रोको व जेलभरो आंदोलन बावनकुळेंच्या राजकीय जीवनात टर्निंग पाँईट ठरले. एका आंदोलनाने त्यांच्यातील नेतृत्वगुण पुढे आले.


राजकीय जीवनाची वाटचाल
भाजप चे नागपूर जिल्ह्यातील मोठे नेते तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची नजर पडली चंद्रशेखर बावनकुळे वर. भाजप चे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील नेत्रृत्व गुण ओळखुन त्यांना भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये मोठी जबाबदारी दिली. छत्रपती सेनेतुन भाजप मध्ये प्रवेश घेताच नितीन गडकरी यांनी त्यांना थेट जिल्हा परिषद निवडणुकीची तिकिट दिली. भाजप च्या तिकिटावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्कालीन कांग्रेस चे उमेदवार हुकुमचंद आमधरे यांचा 1997 मध्ये पराभव केला. त्यानंतर परत 2002 ला ते दुसऱ्यांदा कांग्रेसचे हुकुमचंद आमधरे यांचा पराभव करीत जिल्हा परिषद सदस्य बनले. बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून नागपुर जिल्हा परिषद चांगलीच गाजविली. 2010-11 या कालावधीत भारतीय जनता पक्षाने नागपूर जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविले. त्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. जिल्हाध्यक्षानंतर त्यांना भाजपचे प्रदेश सचिव करण्यात आले.


आणि पाहता-पाहता ऑटोचालक ते जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार ते थेट कॅबिनेट मंत्री अशी मजल त्यांनी मारली. अशा या व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे.
जिल्हा परिषद सदस्य ते आमदारकीचा वाटचाल
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांच्या विरोधात कामठी-कुही विधानसभेत चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपतर्फे निवडणुक लढविण्याची मोठी संधी नितीन गडकरी यांनी दिली. बावनकुळेंनी 2004 साली भाजपतर्फे विधानसभा निवडणुक लढविली. कांग्रेस रिपाइं च्या संयुक्त उमेदवार सुलेखाताई कुंभारे यांना मतविभाजनाचा फटका बसला.कांग्रेसचै बंडखोर उमेदवार पुरुषोत्तम शहाणे यांनी घेतलेल्या तब्बल 27 हजार मतांमुळे तत्कालीन राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांचा धक्कादायक पराभव चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्यानंतर परत 2009 व सन 2014 मध्ये आमदार म्हणून निवडून येत बावनकुळे यांनी कामठी विधानसभा मतदारसंघातून पहिली हॅटट्रिक मारली. चन्द्रशेखर बावनकुळे यांना दोन अपत्ये आहेत. एक संकेत व दुसरी पायल.


नियमित जनता दरबार
मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी योजनावद्ध कार्यक्रम राबविला. कोणताही नागरिक समस्या घेऊन आपल्याकडे आल्यास तो परत जाऊ नये यासाठी जनवा दरवार येण्यास सुरुवात केली. समस्या घेऊन आलेल्या नागरिकाची समस्या काय ती कशी सोडविता येईल, किती दिवसात ती सोडविली जाईल याचे नियोजन करून संबंधित व्यक्तीला तेवढ्या दिवसाचा वेळ देऊन वी समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याकरिता शिस्तीने आखणी करणारे ते आगळेवेगळे आमदार असावे.
चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे 13 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय. 26 डिसेंबर 2014 रोजी नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पडतीचा काळ ही बघितला…
राज्याचे ऊर्जावान ऊर्जामंत्री म्हणुन ओळखलै जाणारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी विधानसभेत हैट्रिक मारल्यानंतर ही त्यांची 2019 मध्ये भाजप नेत्यांनी उमेदवारी कापली. उमेदवारी साठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या कडे अतोनात प्रयत्न केले. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना केंद्रीय नेत्रृवाने उमेदवारी दिली नाही.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले नाही, ते त्यांच्या पत्नी ज्योती यांना देण्यात आले, त्यांनी कामठी येथून 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरला, परंतु शेवटच्या क्षणी त्यांचा फॉर्म भरल्यानंतर, ज्योती यांना भाजपने एबी फॉर्म नाकारला होता.त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला होता.
त्यांची उमेदवारी कापीत जिल्हा परिषद सदस्य राहीलेले टेकचंद सावरकर यांना भाजप ने आपला उमेदवार बनवले. बावनकुळेंच्या समर्थकांनी कामठी विधानसभेसाठी त्यांच्या पत्नी ज्योती चंद्रशेखर बावनकुळे यांचा नामांकन अर्ज दाखल केला होता. नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप चे शिस्तप्रिय कार्यकर्ता या नात्याने त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे बोलले जाते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रामाणिक पणे टेकचंद सावरकर यांच्या विजयासाठी प्रयत्न केले.सन 2019 हा खरे पाहता त्यांचा पडतीचा काळ होता. परंतु त्यांनी हार मानली नाही. ते पक्षासाठी ईमाने इतबारे झिजत राहिले सन 2022-23 मध्ये त्यांची भाजपसाठी धडपड बघता त्यांना नागपुर विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी मिळाली. त्या निवडणुकीत त्यांनी कांग्रेसचे समर्थित उमेदवार तत्कालीन महादुला नगरपंचायत चे नगरसेवक मंगेश देशमुख यांचा पराभव केला. आणि मग यशाची शिखरे पुन्हा बावनकुळेंनी पादाक्रांत केली. भाजप च्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे बावनकुळे यांनी राज्यात स्वतःला फायरब्रांड व आक्रमक नेता म्हणून आपली धाक निर्माण केली. त्यांनी याकाळात राज्यातील जेष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार, यांच्या बारामती मध्ये व शिवसेना नेता उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मुंबई मध्ये रान उठवले. भाजप प्रदेशाध्यक्ष बनताच विरोधी राजकीय पक्षांचे नेते भाजपात आणण्यात बावनकुळेंना मोठे यश आले. नागपूर जिल्ह्य़ातील कांग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे हजारो कार्यकर्ते भाजपात आणुन विरोधी पक्ष अगदी खिळखिळे करुन टाकले बावनकुळेंनी. आज नागपुरात विरोधी पक्ष औषधाला उरलाय. एकही विरोधी पक्षातील नेता नागपुरात बावनकुळे विरोधात तोंड उघडत नाही. ईडीची भीती म्हणा कि आपले शाळा काँलेज वाचवायची तळमळ. बावनकुळे विरोधात कोणीही उघडपणे बोलतांना आज नागपुरात दिसत नाही. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी नागपुरात एकतर्फी विजय मिळविला. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजप ला ओळख मिळाली ती बावनकुळेंच्या माध्यमातून हे विशेष.
सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप ला 135 जागी मिळालेल्या दैदीप्यमान यशाचे मुख्य सुत्रधार चंद्रशेखर बावनकुळे होते.विरोधकांनी त्यांच्यावर ईव्हीएम मास्टरमाईंड असल्याचे आरोप लावले. परंतु त्यांचे आरोप बावनकुळेंनी खोडून काढले. कामठी विधानसभेत वोटचोरी चे थेट आरोप दिल्लीतून कांग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी सुद्धा लावले. परंतु बावनकुळे भिले नाहीत. त्यांनी आक्रामकणे निवडणुक आयोगाची कार्यप्रणाली पारदर्शी असल्याचा दावा करीत आकडेमोड सादर केली. आज ते राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे कैबिनेट मंत्री आहेत महसुलमंत्री त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला. शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध व्हावे यासाठी धडाडीचे वेगवेगळे नियम आणित महसुल खात्यात अमुलाग् बदल घडविला….. बावनकुळेंच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की बावनकुळे यांच्या कडे विकासाचे विजन आहे..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर चे दुसऱ्या नंबरचे नेते म्हणून आज चंद्रशेखर बावनकुळे ओळखले जातात.
.. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भविष्यातील मुख्यमंत्री म्हणून बघितले जाते.
… अशा स्रृजनशील संयमी भाजप वर कमांड असलेल्या उत्तुंग व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या 13 जानेवारी रोजी वाढदिवस कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे साजरा होईल. चंद्रशेखर बावनकुळे हे कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. बावनकुळेंच्या पत्नी ज्योतीताई बावनकुळे अध्यक्ष असलेल्या महादुला व्हिलेज डेव्हलपमेंट स्किम संस्थेला श्री कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर ट्रस्टमध्ये विलिन करण्यात बावनकुळेंनी यश मिळविले. महादुला व्हिलेज डेव्हलपमेंट स्किम संस्थेची सेवानंद विद्यालय शाळा आता कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर संस्थान चालवित आहे. माता जगदंबा चा चंद्रशेखर बावनकुळे यांचेवर सदैव आशिर्वाद असल्याने चंद्रशेखर बावनकुळे नेहमी माता जगदंबा चे मोठे निःसिम भक्त आहेत. ते सपत्नीक महालक्ष्मी मंदिरात जगदंबा मातेची आराधना करतात. दरवर्षी प्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात साजरा होतो. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त VANSH NEWS तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
💐💐💐💐🎂🎂🎂
HAPPY BIRTHDAY ना. चंद्रशेखर बावनकुळे (महसुलमंत्री)

































