श्री.सुनील उत्तमराव साळवे (9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
कामठी /नागपुर :10 मे 2025
वैशाख बुध्द पौणिमा च्या निमित्ताने कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या मार्गदर्शनात विशेष बुध्द वंदना व धम्मदेसना चे आयोजन करण्यात आले आहे.



सोमवार दिनांक 12 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुजनिय भिक्खु संघाद्वारे विशेष बुध्द वंदना घेवून उपस्थित उपासक-उपासिकांना धम्मदेसना देण्यात येणार आहे.
वैशाख पौर्णिमच्या निमित्ताने ड्रॅगन पॅलेस टेम्पल स्वच्छ धुवून काढण्यात आला आहे ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या मध्यभागी असलेल्या 864 किलो वजनी अखंड चंदनाच्या तथागतांच्या मुर्ती समोर सुंदर रंगबिरंगी फुलांनी सजविण्यात येणार आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील बगीच्या मध्ये विविध रंगाच्या फुलवि झाडे लावण्यात येत आहेत. व ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा संपूर्ण परीसर पंचशीलव्या झेंडयानी न्हाऊन गेला आहे. तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पलला आकर्षक विद्युत रोशनाईने सुध्दा सजविण्यात आले आहे.
ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटर येथे एक दिवसीय ध्यान शिबीराचे आयोजन
सोमवार दिनांक 12 मे 2025 रोजी वैशाख बुध्द पौर्णिमाचे औचित्य साधुन ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटर येथे दिनांक 12 मे 2025 रोजी एक दिवसीय ध्यान शिबीराचे आयोजन सुध्दा करण्यात आलेले आहे. हे शिबीर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे पर्यत होणार आहे. या ध्यान शिबीरामध्ये ज्या साधकांनी 10 दिवसीय ध्यान शिबीर केले असतील त्यांना थेट सहभागी होता येईल. अशी माहीती ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटरच्या व्यवस्थापिका रेखा भावे यांनी दिली.
