VANSH NEWS यु ट्युब चैनल च्या बातमीचा Special Impact, मध्यप्रदेश कोर्टाने घेतली दखल
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
मध्यप्रदेश : 14 मे 2025
मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह ने कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चांगलेच अडचणीत सापडला असुन विजय शाह विरोधात केवळ मध्यप्रदेशातच नव्हे तर संपुर्ण देशभरात तीव्र असंतोष निर्माण झाला होता यासंदर्भात निष्पक्ष निर्भिड यु ट्युब चैनल वर आज प्रसारित बातमीत भाजप मंत्री विजय शाह ने भारतीय सेनेच्या प्रामाणिक व शुर सैन्य अधिकारी सोफिया कुरैशी यांचेबद्दल आक्षेपार्ह विधान करुन संपुर्ण भारतीय सेनेचा अपमान केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची संज्ञान घेऊन जातीयवादी मानसिकतेने ग्रसित भाजप मंत्री विजय शाह चे वक्तव्य देशद्रोही असुन अशा समाजकंटकास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. मध्यप्रदेश कोर्टाने स्वतः दखल घेत भाजप मंत्री विजय शाह विरोधात FIR दाखल करण्यचेपु आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश कांग्रेस च्या वतीने प्रत्येक जिल्ह्य़ात भाजप च्या समाजकंटक विजय शाह यांचे विरोधात FIR करण्याची व त्याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी उद्या राज्यभर आंदोलनात्मक भुमिका मध्यप्रदेश कांग्रेसचे अध्यक्ष जितु पटवारी यांनी घेतली आहे.
विजय शाह वक्तव्याविरोधात कोर्टाने कमालीची आक्रमक भूमिका घेतली असून, सोफिया कुरेशींबाबत केलेल्या विधानाची स्वत:च दखल घेत मध्य प्रदेश हायकोर्टाने विजय शाह यांच्याविरोधात चार तासांच्या आत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांच्या खंडपीठानं विजय शाह यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हटलं. आता उद्या सकाळी पुन्हा या प्रकरणी सुनावणी होईल.
भाजप मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.”त्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले होते, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवले की, जेणेकरुन ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या, त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्न करुन सोडेल”, असं विजय शाह म्हणाले होते.
भाजप मंत्री विजय शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांच्यासह काँग्रेसचं शिष्टमंडळ श्यामला हिल्स पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल होतं. काँग्रेसनं विजय शाह यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली. मध्य प्रदेश काँग्रेस उद्या या प्रकरणी राज्यभरात पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी म्हणाले, भाजपच्या विजय शाह यांनी सैन्याचा अपमान केला आहे. त्यांना एक मिनिट देखील मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. विजय शाह यांच्या वक्तव्यामुळं देशातील लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता..
