राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात शिवसेना पक्षाला उत्तुंग भरारी!
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कांद्री-कन्हान/नागपुर : 22 नोव्हेंबर 2025
नागपुर जिल्ह्यात पुन्हा एकदा कांग्रेसला झटका बसला आहे.कांग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी कोणतेही काम होत नसल्याने शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कांग्रेस ला मोठा झटका समजल्या जातो. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे शिवसेना पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू असुन महायुती मधील भाजप नंतर सर्वाधिक मजबुत पक्ष म्हणून शिवसेना (शिंदे) पक्षाकडे नागपुरात बघितले जाते. शिवसेना पक्षाचे विधानपरिषद सदस्य क्रृपाल तुमाने व राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल यांनी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढण्याची आपली ताकद नागपुरात निर्माण केली आहे.


कांद्री येथील काँग्रेस कमिटी अध्यक्षा अर्चना चंद्रभान तांडेकर यांच्यासह अनेक माता-भगिनींनी आणि मान्यवरांनी माझ्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचा भगवा हाती घेऊन जनतेसाठी उत्साहाने कार्य करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. सर्वांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला माझा पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. कांद्रीत नगरपंचायत स्थापन झाल्यापासून ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांच्यात उत्साह आहे.

यावेळी पक्षप्रवेश केलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे – मीना प्रमोद गिऱ्हे, कुसुम मोतीरामजी ठाकरे, कविता महेंद्र चलवे, मोनिका चिंतामण मंडलेकर, वैशाली खोब्रागडे, विनोद मुकुंदराव गिऱ्हे, चंद्रभान तांडेकर, प्रमोद मुकुंदराव गिऱ्हे, जयश्री गळपांडे, लिना शैलेश बाजाइत, शिल्पा खेरळकर, दिवशिता मानकर,अश्विनी दिनेश कुंभरे, मनीषा शिवा इनवाते, झामिनी भूखन यादव, सरोज महेश शर्मा, संगीता राजेश शर्मा, रेखा चुन्नीलाल कुर्वेकर, ममता बालचंद बिलोने, अमित बालचंद बिलोने, निलेश श्यामकुमार शर्मा.
याप्रसंगी कांद्रीचे माजी सरपंच मुकुंदराव गिऱ्हे,जितेंद्र चौहान,नरहरी पोटभरे, गेंदलाल सरोदे ,गजानन गजभिये,चंद्रपाल कश्यप,विशाल भूते, राजू यादव,बंटी सरोदे, मोतीराम ठाकरे आदी उपस्थित होते.



































