श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
मुंबई : 28 आँक्टोबर 2025
“अमित शाह यांना ‘ॲनाकोंडा’ म्हणणारे उद्धव ठाकरे हे स्वतःच ‘अजगर’ आहेत अशी जळजळीत टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमाशी बोलतांना केली.
उद्धव ठाकरेंवर टीका करतांना ते पुढे म्हणाले की, या अजगराने आधी पक्ष गिळंकृत केला, मग शिवसैनिकांना गिळंकृत केले आणि शेवटी हिंदुत्वही गिळंकृत केले. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त मानसिकतेतून टीका करत आहेत. सत्तेत असताना ‘मी मुख्यमंत्री आणि माझा मुलगा मंत्री’ यापलीकडे त्यांनी काहीही केले नाही. दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा त्यांनी आधी आपलं काचेचं घर सांभाळावं. उद्धव ठाकरेंच्या ‘भुरटे चोर’ या टीकेचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले, “खरा ‘भुरटा चोर’ कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. जर उद्धव ठाकरे अशा छोट्या-छोट्या चोऱ्यांमध्ये अडकले नसते, तर आज ते राज्याचे मोठे नेते असते. पण ‘भुरट्या चोरी’तच राहिल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे,” अशी जळजळीत टीका त्यांनी केली.




































