श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नाशिक : 27 जानेवारी 2026.
राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काल झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यानी भाषण करतांना संविधान निर्मितीत ज्यांचा काडीमात्र संबंध नाही अशा महापुरुषांचे नाव गिरीश महाजन यांनी घेतले. परंतु त्यांनी आपल्या भाषणात संविधान निर्माता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एकदा ही नाव घेतलेले नाही.आता प्रश्न असा निर्माण होतो की पालकमंत्री गिरीश महाजन यांना ही बाब डायसवर बसलेले जिल्हाधिकारी नाशिक, विभागीय आयुक्त यांनी का लक्षात आणुन दिली नाही. गिरिश महाजन यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विसर का पडला? ज्या दिवशी संविधान समितीतील मसुदा समिती चे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला अर्पण केली ती प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू व राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हातात. आणि याच दिवसापासून संपुर्ण देश संविधान निर्माता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नामस्मरण करतो. हे वास्तविक सत्य आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता असलेले समरसतावादी गिरीश महाजन यांचे माध्यमातून पुन्हा एकदा संविधान निर्माता नेमके कोण? अशी वायफळ चर्चा /संभ्रम देशात सुरू झाली. प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे काही बंधनकारक आहे का? मसुदा समितीत 288 सरस्य होते मग प्रत्येकाचे नाव घेतलेच पाहिजे का? अशा निरर्थक चर्चा संघोट्यांनी सुरु केल्या. वास्तविक संविधान निर्मातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुमुल्य योगदान होते असे मसुदा समितीच्या इतर सर्व सदस्यांनी स्विकार केले. परंतु तरी त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला कधीच श्रेय घेतले नाही. ते म्हणाले आमच्या सर्व सहकाऱ्यांचे यश आहे. त्यांच्या सहकार्यामुळे च आम्ही जगातील सर्वोत्तम असे संविधान तयार करु शकलो.
आता आपण वळु या गिरीश महाजन कडे, गिरीश महाजन, तुम्ही फक्त एकाच बाबीचा खुलासा खरा. प्रजासत्ताक दिनाचे लिखित भाषण जिल्हाधिकारी नाशिक व जिल्हा माहिती अधिकारी नाशिक यांनी लिखित स्वरूपात दिले होते काय?
त्या भाषणामध्ये जिल्हाधिकारी नाशिक यांनी प्रजासत्ताक दिन म्हणजे भारतीय संविधान लोकशाही, भारतीय संविधान सभेचे सर्व सदस्य, ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणजेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रामुख्याने उल्लेख केला होता काय?
जर लिखित भाषणात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळलेला असेल तर जिल्हाधिकारी नाशिक आणि जिल्हा माहिती अधिकारी नाशिक यांच्याविरुद्ध पुढील योग्य कार्यवाही करण्यास विलंब का करत आहात?
तुम्ही ज्या डायसवरून उत्स्फूर्तपणे अन्यघोषणा दिल्या, आणि तुमच्या लक्षात आले असेल की फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डॉ. बाबासाहेबांचे नाव त्यांचा उल्लेख करणे राहून गेले आहे. तर त्याच डायसवरून
तात्काळ आपण झालेल्या चुकांची दुरुस्ती केली असती तर पुढील हे प्रसंग आणि संघर्ष उद्भवले असते का?मंत्री म्हणून चूक कोणाची?
तुम्ही दरवर्षी निळा शर्ट, निळा गमचा, निळा झेंडा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीत लेझीम खेळत सहभागी होणे , किंवा पुतळ्यांची निर्मिती करणे. या बाबी महामानवांच्या प्रति प्रेम व दलित बौद्ध आंबेडकर मतें या दोन्ही बाबीशी संबंधित आहेत.हे तर कोणी पण मान्य करेल!
पण जेव्हा आपले भाषण सार्वजनिक स्वरूपात देशभरात लोक पाहतात, ऐकतात तेव्हा आपण समय सूचकता दाखवायला हवी होती. ती मात्र आपल्याकडून समय सूचकता दिसून आली नाही. चूक झाल्याबरोबर आपण ती दहाच (10) सेकंदामध्ये दुरुस्त करायला हवी होती. वेळ होती. तिथे आपली प्रतिमा आणखीनचं उजळ झाली असती!
पण असे आपल्याकडून घडले असते तर, त्या माधवीताई जाधव कडून किंवा दर्शना सौपुरे यांच्याकडून हीं नैसर्गिक,उत्स्फूर्त प्रतिक्रिया कदाचित आली हीं नसती. त्यामुळे आपणास जेव्हा चुकीचा साक्षात्कार झाला, तेव्हा त्याची दुरुस्ती करायला वेळ झाला.
गिरिश महाजन यांनी झालेल्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.गिरीश महाजन म्हणतात, अनावधानाने मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. पण मी बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो. जामनेर तालुक्यातील प्रत्येक भीमजयंतीत मी टैक्टर घेऊन पुढे असतो नीळे शर्ट घालून मी लेझीम ही खेळतो. वाद्यसामग्रीची व्यवस्था लावतोय. असे महाजन म्हणतात परंतु भीमजयंतीत दिवसभर टैक्टर वर बसुन बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावर नाचल्याने कोणी त्यांचा अनुयायी कसा होऊ शकतो? त्यासाठी फुले शाहू आंबेडकरांचे विचार डोक्यात असायला हवेत. RSS मध्ये काम करणाऱ्यांच्या डोक्यात धार्मिक गुलामी, सनातनी, मनुवादी कट्टरता ठासून भरलेली असते. त्यामुळे ते समरसतेचा आव आणतात ते समता मानत नाही. समरसतेचा प्रयोग करीत गोळवळकर, हेडगेवार च्या बाजुला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवतात गोळवळकर हेडगेवार यांची विचारधारा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समता सातंत्र्य व बंधुत्वाची विचारधारा ही विपरीत आहे. कालचा प्रकार घडल्यानंतर ही महाजन चुक झाली माफ करा हे मानायला तयार नाही. ते दिलगिरी व्यक्त करुन मोकळे झाले. त्यानंतर त्यांची अंधभक्त पिलावळ त्यांचे जुने भीमजयंतीत तील फोटो व विडिओ वायरल करुन ते आंबेडकरवादी असल्याचे सोशल मीडिया मध्ये दाखवत आहेत. पण सध्या कालच्या घटनेमुळे गिरीश महाजन सध्या अडचणित आले असुन विरोधी राजकीय पक्षांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यांचे मंत्रीपद ही अडचणित आहे. आज यासंदर्भात कैबिनेट बैठक असुन यांवर मुंबईत चर्चा होणार आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे वाद प्रतिवाद निर्माण होण्यास गिरीश महाजन, केवळ” तुम्ही आणि तुमची समसूचकता” न दाखवणे याच गोष्टी जबाबदार आहेत. कारण आपण एका राज्याचे जबाबदार मंत्री आहात.
आता वंचित नेता बाळासाहेब आंबेडकर यांनी नाशिक चे जिल्हाधिकारी व माहिती अधिकारी यांना धारेवर धरायची गरज आहे. कारण प्रशासनामध्ये आजही मनुवादी अधिकारी खुर्च्या गरम करीत आहेत. आजही त्यांच्या मनात जयभीम घेण्यासाठी मनात तिरस्कार आहे. संविधान निर्माता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते हे वास्तविक सत्य आहे.
प्रजासत्ताक दिनी, संविधान दिनी ज्याप्रमाणे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अनिवार्य केले त्याचप्रमाणे संविधान निर्माता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सर्व शासकीय कार्यालये, शाळा /काँलेज च्या कार्यक्रमात अनिवार्य करावेत जे विरोध करतील त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.































