कामठी नगर विकास आघाडीला “बरिएम” चे जाहीर समर्थन
बरिएमं विकासाच्या प्रवाहात सामील
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी /नागपुर : 10 जानेवारी 2026
“निवडणुकीच्या मैदानात जय-पराजय होतच असतो, मात्र शहराचे हित आणि विकास यापेक्षा मोठे दुसरे काहीही नाही. कामठीचा चेहरामोहरा बदलणे आणि येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन एकता मंच (बरिएम) च्या मुख्य संयोजिका आणि माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले.
कामठी नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी निर्माण झालेल्या ‘कामठी नगर विकास आघाडी’ ला ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी जाहीर समर्थन देऊन शहराच्या राजकारणात एक नवी दिशा निश्चित केली आहे.
लोकशाहीचा सन्मान आणि विकासाची ओढ
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचने अत्यंत ताकदीने निवडणूक लढवत 12598 हजारांहून अधिक मते मिळवून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. मंचचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय कदम यांनी कामठी शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊनच ही निवडणूक लढविली होती. निवडणुकीचा निकाल काहीही लागला असला, तरी जनमताचा आदर करून शहराच्या प्रगतीचा रथ पुढे नेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
विकासासाठी मतभेद विसरले!

नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचने अत्यंत ताकदीने निवडणूक लढवत 12 हजारांहून अधिक मते मिळवून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. या निकालानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बहुतांश नगरसेवकांनी एकत्र येत ‘कामठी नगर विकास आघाडी’ची स्थापना केली. या आघाडीचा उद्देश केवळ शहराचा विकास हाच असल्याने, सुलेखाताईंनी कोणतीही राजकीय कटुता न बाळगता या आघाडीला पाठिंबा देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे.
दोन नगरसेवकांचा आघाडीत समावेश
शहराच्या विकासकामांत ‘बरिएमं’चा सक्रिय सहभाग असावा, या उद्देशाने पक्षाचे नगरसेवक नियाज कुरेशी आणि आकाश भोकरे यांचा या नवनिर्मित आघाडीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे नगर परिषदेत विकासाची फळी अधिक मजबूत झाली असून, प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
”आमच्यासाठी राजकारणापेक्षा समाजकारण आणि शहराचा विकास श्रेष्ठ आहे. वैयक्तिक किंवा राजकीय मतभेद बाजूला सारून कामठीच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ‘कामठी नगर विकास आघाडी’च्या माध्यमातून आम्ही शहराचा कायापालट करू.”
— ॲड. सुलेखाताई कुंभारे (संयोजिका, बहुजन रिपब्लिकन एकता मंच)
लक्षवेधी ठरणारी राजकीय समीकरणे
ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या या निर्णयामुळे कामठीच्या राजकीय वर्तुळात नवा उत्साह संचारला आहे. विरोधक काय भूमिका घेतात यापेक्षाही, सत्ताधारी आणि ही नवीन आघाडी मिळून कामठीच्या जनतेला काय नवीन देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. “सर्वोच्च प्राथमिकता फक्त विकास” या सुलेखाताईंच्या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.



































