श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
मुंबई : 6 नोव्हेंबर 2025
महाराष्ट्रासह हरियाणा, राज्यातील मतदारयादीत ब्राझिलियन माँडेल चे 20 पेक्षा जास्त ठिकाणी दुबार नावे, एकाच पत्तावर 100-150 मतदारांची नावे यांवरुन कांग्रेस नेता खा. राहुल गांधींनी मतचोरी चा (Votechori) आरोप केला? राहूल गांधींचे निवडणुक आयोगावर मागील काही दिवसांपासून कडाडून प्रहार करणे सुरु असतानाच राज्याचे महसूलमंत्री यांनी राहुल गांधी यांचेवर टीका करीत “राहुल गांधींचे हे ‘वेडेपण’ आहे असा टोमणा आज पत्रपरिषदेत मारला.
ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी आधी महाराष्ट्रातील मतदार याद्यांचा अभ्यास करावा. दुबार नावे असणे हा काही नवीन प्रकार नाही, तो संपूर्ण राज्यात असल्याचे बावनकुळेंनी मान्य केले. ते पुढे म्हणाले की, कामठीत माझ्याविरुद्ध लढलेल्या काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश भोयर यांचेच नाव दुबार आहे, हे राहुल गांधींना दिसत नाही का?” असा टोला लगावत बावनकुळे यांनी राहूल गांधींच्या आरोपाचा समाचार घेतला.
बावनकुळे म्हणाले, “दुबार नाव असले तरी मतदान एकच व्यक्ती करते, कारण शाई लावली जाते. जी मतदारयादी वापरून महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले, तीच यादी आता विधानसभेत पराभव झाल्यावर चुकीची कशी ठरू शकते? नगरपालिका निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने हा ‘फेक नरेटिव्ह’ पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.”
आता यांवर कामठी विधानसभा लढलेले कांग्रेस नेता पत्रपरिषदेतुन काय उत्तर देतात यांवर जनतेचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या वोटचोरी (Votechori). चा मुद्दा देशभर गाजला आहे. कांग्रेस नेता राहुल गांधी सह विरोधी पक्षनेते मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकार व राज्य सरकार यांचे विरोधात एकीकडे आक्रामक होत निवडणुक आयोगाला मतदारयादीतील घोळावर प्रश्न विचारत आहे, तर दुसरीकडे भाजप चे नेते यांवर मीडिया तुन उत्तर देतांना दिसत आहे. यांवरुन विरोधी पक्षनेते यांनी भाजप नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे की, निवडणुक आयोगाला आम्ही प्रश्न विचारतो अन् मिरची झोंबते भाजप नेत्यांना? सध्या सोशल मीडिया तुन भारतीय नागरिक पारदर्शक निवडणुका होण्यासाठी निवडणुक आयोगावर संशय व्यक्त करीत आहेत. भाजप च्या दबावात निवडणुक आयोग काम करतोय यांवर भारतीय नागरिकांचा आता ठाम विश्वास होत चालला आहे.सध्या निवडणुक आयोगाची पत /प्रतिष्ठा घसरली आहे. जनतेच्या मनातुन त्यांवर चा विश्वास गमावला आहे. हे मात्र नक्की.



































