एक दिवसीय विपश्यना शिबीरात सहभागी होऊन शेकड़ो साथकांनी घेतला धम्मलाभ.
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Portal media services.
कामठी/नागपुर : 11 जुलै 2025
गुरू पौर्णिमा निमित्त कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या ड्रैगन पॅलेस टेम्पल विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे एक दिवसीय विपस्सना ध्यान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे शुभारंभ सकाळी 9:30 वाजता त्रिशरण पंचशिल ग्रहण करून करण्यात आले व गुरू पौर्णिमेचे महत्व सांगणा-या पुज्य गुरूजी गोयंकाजी यांच्या ऑडीयो प्रवचनाने सायंकाळी 4:30 वाजता शिबीराचा समारोप झाले या शिबीरामध्ये ज्या साधकांनी 10 दिवसीय शिबीर केले असेल अश्या साधकांना थेट प्रवेश देण्यात आले.



ड्रॅगन पॅलेस टेम्पल विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे नियमित दहा दिवसीय, तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. दर पौर्णिमला सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत एक दिवसीय शिबिराचे आयोजन केल्या जाते, तसेच सामुहीक साथले करिता रोज सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत ड्रॅगन पॅलेस टेम्पल विपश्यना मेडिटेशन सेंटर येथील धम्मसभागृह उपलब्ध करण्यात आलेले आहे.
या एक दिवसीय ध्यान शिबिरामध्ये ड्रॅगन पॅलेस टेम्पल, ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटर च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे, रेखा आवे, रजनी लिंगायत, वंदना भगत, नंदा गोडघाटे, तक्षशिला वाघधरे, विशाखा गेडाम, वैषाली बंसोड, संगीता राहाटे, सुधा रंगारी, ज्योजी चव्हाम, नंदा कापसे सोबतच शेकडो साधकांनी ध्यान शिबिरात सहभागी होऊन धम्मलाभ घेतला.
भिक्खु संघाच्या उपस्थितीत शिल व धम्मदेसना प्रदान
आषाढ पौर्णिमच्या पावन पर्वावर विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे आज गुरवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पुजनिय भिक्खु संघाच्या उपस्थित विशेष बुध्द वंदना व धम्मदेसना घेण्यात आली. उल्लेखनीय आहे की, आषाढ पौर्णिमिला अनन्य असे असाधरण महत्व प्राप्त आहे. आषाढ पौर्णिम पासुन वर्षावास चा प्रारंभ होत असते. त्या निमित्ताने ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे वर्षावास करणा-या बौध्द उपासक उपासिकांना पुजनिय भदंत ज्योतीबोधी यांच्या वतीने अष्ठ उपोसक शिलग्रहण प्रदान करण्यात आले, या प्रसंगी भिक्खु संघाला ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या द्वारे धम्मदान व चिवरदान देण्यात आले.
गुरू पौर्णिमा निमित्त ड्रॅगन पॅलेस येथील महाकारूणिक तथागत गौतम बुध्दांच्या मुर्ती ला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात येत आहे. तसेच कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता ड्रॅगन पॅलेस परीसरात कार्यरत असलेले धम्मसेवक व धम्मसेविका अथक परिश्रम घेतले.




