श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
पांजरा कोराडी /नागपुर :17 डिसेंबर 2025
नागपुर जिल्ह्यातील कोराडी पांजरा वस्तीत मोठ्या प्रमाणात HP घरगुती गैस सिलेंडर ची टंचाई निर्माण झाली आहे. कोराडी काँलनीत केटीपिएस कंजुमर को आपरेटिव सोसायटी HP गैस सिलेंडर ची मोठी वितरक एजंसी असुनही सोसायटी च्या संचालकांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
गेल्या 2-3 दिवसापासून कोराडी पांजरा वस्तीत गैस वितरक कर्मचारी व नागरिकात गैस सिलेंडर देण्यावरुन बाचाबाची झाली असल्याचे समजते. सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार गैस वितरक कर्मचारी हे अवैधरीत्या गैस सिलेंडरची विक्री करीत असल्याचे समजते. परिणामी गरजु नागरिकांना गैस सिलेंडर चा पुरवठा होत नाही. महादुला कोराडी येथील काही दुकाने व हाटेल्स मध्ये अवैधरीत्या गैस सिलेंडर ची अवैध विक्री होत आहे. त्यामुळे कोराडी पांजरा येथे गैस सिलेंडर भेटत नाही अशी नागरिकांची ओरड आहे.
केटीपिएस कंजुमर को आपरेटिव सोसायटी च्या संचालकांचे याकडे दुर्लक्ष होत असुन या परिसरात नियमीत सिलेंडर ची गाडी पाठवावी अशी नागरिकांची मागणी आहे.




































