२९ सप्टेंबर 2025 रोजी होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रमा नगर उडाणपुलाचे लोकार्पण.
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Webportal online
कामठी/नागपुर : 24 सप्टेंबर 2025
मागील 7 वर्षापासुन बहुप्रतिक्षित सुरू असलेले रमानगर रेल्वे उडान पुलाचे रखडलेले बांधकाम पुर्णत्वास आले असुन येत्या २9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता केंद्रीय सडक परीवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते व नागपुर जिल्हयाचे पालकमंत्री, तसेच माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
रमा नगर उडाण पुल धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी वाहतुकीसाठी खुला व्हावा व ड्रॅगन पॅलेसला येणा-या लाखो लोकांना सुरक्षित पणे येणे जाणे करता यावे यासाठी ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिले तसेच दिनांक 25 सप्टेंबर 2025 ला बहुजन रिपब्लिकन एकता मंच द्वारे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला होता. अस्खेर ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रयत्नाला यश आले असुन कामठी वासियांना होणा-या त्रासापासुन सुटका मिळणार आहे.


रमा नगर उडाण पुलावे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे 99% पूर्ण करण्यात आले आहे. आठ दिवसापूर्वी नागपुर चे पालकमंत्री यांनी पुलाची पाहणी केली होती. यावेळी उर्वरीत कामे त्वरीत पूर्ण करण्याच्या संबंधीत विभागाला सुचना केल्या होत्या, अखेर उडान पुल जनतेसाठी खुला होण्यास प्रशासनाला मुहुर्त सापडला असुन कामठीतील नागरीकांना दिलासा मिळणार आहे.
उल्लेखनीय आहे की, दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे 8 ते 10 लाख अनुयायी भेट देत असतात दरवर्षी यामध्ये वाढ होत आहे, सध्या कामठी येथे मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे कामठी कन्हान मार्गावर बॅरीकेट लावुन रस्ता अरूंद करण्यात आला आहे. त्यामुळे ड्रॅगन पॅलेसला येणा-या अनुयायांना येणे-जाणे त्रासदायक झाले होते. बस, चारचाकी वाहणे ड्रॅगन पॅलेस परिसरात येतू शकत नव्हती व नागरीकांना मोठी गैरसोय होत होती. परंतु आता रमा नगर उडान पुल नागरीकांसाठी खुला होणार असल्यामुळे नागरीकांची गैरसोय दुर होईल असा विश्वास ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केला.
































