श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी/नागपुर 18 आँक्टोबर 2025
सन 2021 मध्ये विकास कामांच्या नावाखाली शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी कामठी (जुनी) पोलिसांनी कामठी नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष मोहम्मद शाहजहाँ शफाअत अन्सारी, उपाध्यक्ष अहफाज अहमद अब्दुल शकूर, नगरसेविका रमा नागसेन गजभिये आणि मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली. यासंदर्भात काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र राधेश्याम शर्मा, रा. गुड ओली कामठी यांनी जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे तक्रार केली होती.पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने त्यांनी शेवटी न्यायालयात दाद मागितली. सन 2021 मध्ये कामठी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे मोहम्मद शाहजहाँ शफाअत अन्सारी व उपाध्यक्षपदी अहफाज अहमद अब्दुल शकूर, तर मुख्याधिकारीपदी संदीप बोरकर व रमा गजभिये या बसपच्या बांधकाम सभापती होत्या. त्यांच्या कार्यकाळात अण्णाभाऊ साठे दलित नागरी फंडातुन सन 2021 मध्ये कामठी शहरातील प्रभाग क्रमांक 1, 3, 4, 5 7, 8, 10, 11, 12, 13, 14 आणि 16 मध्ये अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण, सिमेंट नाल्यांची दुरुस्ती व बांधकाम, एच.पी. नाली, नाल्यांचे कव्हर, पेव्हिंग ब्लॉक, कल्व्हर्ट व फ्लोरिंग आदी विकास कामांना सुरुवात केली. या सर्व कामांचे कंत्राट पारस इंटरप्रायजेस नामक कंत्राटदार कंपनीला देण्यात आले होते.या कंपनीने ही सर्व कामे पूर्ण न करताच या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी ती पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखविले. कामे अर्धवट असताना कंत्राटदाराला पूर्ण कामांची बिले देण्यात आली. ती कंत्राटदार कंपनी ही नगराध्यक्ष मोहम्मद शाहजहाँ शफाअत अन्सारी यांच्या मालकीची आहे. त्यांच्यासह उपाध्यक्ष अहफाज अहमद अब्दुल शकूर, नगरसेविका रमा गजभिये आणि मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी संगनमत करून ही बिले कंत्राटदार कंपनीला दिली. या मंडळींनी प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करत व त्यांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून निधीची अफरातफर करीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार न्यायालयात दाखल केली होती . काही राजकीय नेते या मंडळींना राजकीय संरक्षण देत असल्याने कामठी नगर परिषदेतील प्रत्येक विकास कामातील भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करण्याची नरेंद्र शर्मा यांनी मागणी केली होती.







न्यायालयीन चौकशीनंतर सर्व पदाधिकारी यांचेवर जुनी कामठी पोलीस ठाण्यात दिली. गुन्हा दाखल केला.
न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करुन पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाचा आदेश प्राप्त होताच कामठी (जुनी) पोलिस स्टेशन चे API मनिष हिवरकर यांनी त्या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 120 (B), 166, 192, 201, 212, 218, 409, 468 व 471 अन्वये गुन्हा दाखल केला.
कामठीच्या विकासासाठी भाजपकडे विजन शुन्य,विकासकामे सांगण्यात भाजप नेते अपयशी तर बरिएमं ला जनतेत पसंती
आता कामठी नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात चाहुल लागली असतांनाच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामठी शहरात कांग्रेस पदाधिकारी यांचा भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला आहे आणि तोही कॉग्रेस पदाधिकारी यांनी उघड केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. प्रशासक म्हणून संदीप बोरकर यांच्याकडे स्वतंत्र कारभार असतांना ही भाजप नेत्यानीक प्रशासकाकडुन होत असलेल्यभा भ्रष्टाचारवर अंकुश लानण्वयात भाजप नेते अपयशी ठरलेत. तसेच मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या प्रशासकीय राजवटीत जवळपास 200 कोटी रुपयांची विकासकामे झाली त्यात मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची दाट शक्यता असुन या भ्रष्टाचारास भाजप नेत्यानीम खतपाणी घातले असण्याचा आरोप कॉग्रेस नेता नरेंद्र शर्मा यांनी Vansh News वर बोलताना लावला. कामठी विधानसभेत भाजपची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली व कॉग्रेस आघाडीवर राहिली. भाजप ची गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एकुण 17 हजार मतांनी पिछेहाट झाली. मागील 25 वर्षापासुन भाजप आमदार मंत्री सत्तेत असुनही कामठीच्या सर्वागिण विकासासाठी एकही ठोस काम सांगण्यात स्थानिक भाजप नेते अपयशी ठरले. अशातच कॉग्रेस पदाधिकारी यांचा कामठी नगर परिषद येथील भ्रष्टाचारामुळे खुद्द कांग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे. या वेळी परिवर्तनाची लाट सुद्धा येऊ शकते. यावेळी बहुजन रिपब्लिकन एकता मंच, वंचित, एआय एम आय एम, समाजवादी पार्टी ला बऱ्यापैकी संधी आहे. कामठी नगर परिषद चा कारभार कर्तव्यदक्ष व प्रामाणिक नेत्रृत्वाकडे जावा अशी कामठी वासियांची इच्छा आहे.
प्रशासकीय राजवटीतील विकासकामातही मोठा भ्रष्टाचार, सखोल चौकशी ची कांग्रेस नेता नरेंद्र शर्मा यांची मागणी

कांग्रेस पदाधिकारी नरेंद्र शर्मा
कामठी नगरपरिषदेत प्रशासकीय राजवट असतांना मोठ्या प्रमाणात विकासकामे एका भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून भाजप च्या कार्यकर्त्यांना दिली गेली असुन या कामात 2021 पेक्षा ही मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती नरेंद्र शर्मा यांनी Vansh News शी बोलतांना सांगितली तसेच या प्रत्येक कामाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्पेशल एसआयटी स्थापन करण्याची मागणी नरेंद्र शर्मा यांनी राज्य सरकारला केली आहे. भाजप ची कमर्शियल ठेकेदारांना विकासकामातील कंत्राटे वाटप त्यात अनियमितता, भ्रष्टाचार याला आधीच जनता त्रस्त झाली होती. अशातच कांग्रेस चे पदाधिकारी ही भ्रष्टाचारात मागे राहिले नाही.
कामठी नगर परिषद मधील भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी होऊन दोषी पदाधिकारी यांचेवर अटकेची टांगती तलवार आहे. जुनी कामठी पोलीस निरीक्षक या प्रकरणात किती पारदर्शक चौकशी करतात याकडेही आता जनतेचे लक्ष लागले आहे.
मुख्याधिकारी यांना जामीन तर अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती यांच्या जामिनावर आज नागपुर सेशन कोर्टात होणार सुनावणी
मिळालेल्या माहितीनुसार मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना 3 दिवसांपुर्वी नागपूर कोर्टातुन जामीन मिळाला असुन त्यांचेकडे निवडणुकीचा कारभार असल्याचे कारण सांगून त्यांनी कोर्टाकडुन जामीन मिळवला असुन आज मुख्याधिकारी यांच्या अंतरिम जामिनावर निर्णय होणार आहे. तर माजी अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष व माजी सभापती यांचा जामीनअर्ज विचाराधीन आहे . त्यांना जामीन मिळतो कि नामंजुर होतो याकडे ही आता जनतेचे लक्ष लागले आहे.




































