श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
सावनेर, ता. 4 नोव्हेंबर 2025
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कपास किसान ॲप वापरून नोंदणी करणे बंधनकारक आहे. जेणेकरून त्यांना किमान आधारभूत किमतीवर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) तर्फे सुरू होणाऱ्या विक्री केंद्रावर कापूस विकता येईल. नोंदणीची मुदत आधी 30 सप्टेंबर व नंतर 21 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. परंतु या कालावधीत नोंदण्या पुरेशा न झाल्याने 31 डिसेंबरपर्यंत नोंदणी प्रक्रिया वाढविण्यात आली आहे.
मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचे भाव कमी असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किमतीवर कापूस विक्रीसाठी कपास किसान ॲप वापरून नोंदणी करावी. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बाजार समिती कार्यालयात नोंदणी सुरू आहे. बाजार समिती कार्यक्षेत्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करून हमीभावापेक्षा कापूस विकण्याच्या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती रवींद्र चिखले यांनी केले आहे.



































