श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital media services
कामठी /नागपुर : 5 जुलै 2025
नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपरिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने प्रशासकीय बदली मागे 10 दिवसापूर्वीच केली आहे. यासंबंधी त्यांच्या बदली चा प्रशासकीय आदेश क्र.एमसीओ-2025/प्र.क्र.204(भाग – 1)/न. वि. – 14 मंत्रालय मुंबई यांनी दि. 24 जुन 2025 ला च काढला आहे. शासनाचे अवर सचिव अ. का. लक्कास यांनी हा आदेश काढला असुन कामठी चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना त्यांच्या पदावरुन कार्यमुक्त करुन त्यांची गोंदिया नगरपरिषद जि. गोंदिया येथे प्रशासकीय बदली करण्यात आली. बोरकर यांना 25 जुन 2025 लाच गोंदिया नगरपरिषद येथे रुजु होण्याचे आदेश ही जारी केले. परंतु संदीप बोरकर अजुनही कामठी नगरपरिषद येथील मुख्याधिकारी पदाची मलाईदार खुर्ची गरम करीत आहेत.



5 वर्षापासून कामठी नगरपरिषद येथे एकाच जागी संदीप बोरकर कसे? कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याची 3 वर्षापर्यतल एखाद्या जागी नेमणुक असते त्यानंतर त्याची प्रशासकीय बदली करण्याचा नियम आहे. 5 वर्षापासून कामठी नगरपरिषद येथे मुख्याधिकारी म्हणुन संदीप बोरकर हे चिकटून बसलेले आहेत. स्थानिक राजकारण्यांचा आशिर्वाद घेत त्यांनी अनेक विकासकामांत अनियमितता केल्याचा विरोधकांकडुन सातत्याने आरोप होत आहे. कामठी नगरपरिषद मागील 3 वर्षापासून भगवान भरोसे चालत होती. जनतेच्या मुलभुत थश्नाकडे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांचेकडून दुर्लक्ष व्हायचे कारण मध्यंतरी त्यांच्याकडे कन्हान, वाडी नगरपंचायत चा ही अतिरिक्त पदभार असल्याने जनतेची कामे होत नसायची. विकासामात सातत्याने भ्रष्टाचार व्हायचा. असेही विरोधक वेळोवेळी आरोप करायचे परंतु स्थानिक राजकारण्यांच्या संरक्षण प्राप्त झाल्याने संदीप बोरकर हे राजकारण्यांच्या गळ्यातील ताईत बनले. हवे ते काम, नियमबाह्य असो कि गैर सर्व कामे, NOC राजकारण्यांनी बोरकर यांचे माध्यमातून मार्गी लावलेत.
आता कामठीत शेकडो कोटी रुपयांचे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असुन यात त्यांचा व सत्ताधारी राजकारण्यांचा “खास इंटरेस्ट” चा बहाणा देत हे काम फक्त आणि फक्त मुख्याधिकारी संदीप बोरकर च ईमानदारी ने पुर्णत्वास नेऊ शकतात असा देखावा उभा केला जात आहे. आज तर नागपुर जिल्हाधिकारी इटनकर यांचे दौऱ्यात संदीप बोरकर यांनी त्यांची बदली झाल्यानंतर ही उपस्थिती दाखवली. कित्येक शासकीय कागदपत्रांवर ते सह्या करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने काढलेल्या त्यांच्या बदली आदेशाची अंमलबजावणी न करता संदीप बोरकर हे मुख्याधिकारी पदाची खुर्ची अद्याप का गरम करत आहेत? अशा जनतेचा सवाल आहे. जनतेला नव्या मुख्याधिकारी यांची कामठी नगरपरिषदेसाठी मागणी असतांना ही संदीप बोरकर यांना गोंदिया नगरपरिषद येथे पदभार घेऊ देण्यापासून कोणता राजकारणी थांबवत आहे याची उलटसुलट चर्चा आता कामठीत रंगली आहे. नेमका बोरकर यांनी कामठीतुन जाऊच नये असा आग्रह असणार्या राजकारण्यांचा मेट्रो प्रकल्पात “खास इंटरेस्ट” मलाईदार कमाई तर नाही ना अशी खमंग चर्चा ही ऐकण्यात येत आहे.
आता विरोधक संदीप बोरकर यांना विचारणार आहे की साहेण तुम्ही महाराष्ट्र शासनापेक्षा मोठे झाले का? तुमची बदली झाली तरी तुम्ही इथेच का खुर्ची गरम करत आहात?
टीप – सदर बातमी जनतेत रंगलेल्या खमंग चर्चा व नवीन सिओ च्या मागणी संदर्भाने आम्ही घेतली असुन स्थानिक सत्ताधारी राजकारण्यांनी मनाला अवघड वाटुन घेऊ नये. बोरकर यांची बदली झाली असल्याने त्यांनी अतितात्काळ गोंदिया येथे जावे. त्यांची बदली थांबवुन कामठी चा विकास खोळंबु नये हीच जनतेची मागणी आहे.
