श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Portal media services.
नागपूर, दि.22 जुलै 2025
भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये 22 ते 26 जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वादळीवारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. दिनांक 23, 24 व 26 जुलै रोजी येलो अर्लट तर दिनांक 25 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दिलेला असुन या कालावधीमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. विज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व विज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप खांडे यांनी केले आहे.

नागरिकांनी जल पर्यटन स्थळी अती उत्साही होवून जीव धोक्यात घालणारी कुठलीही कृती करू नये. शक्यातो पाण्यामध्ये उतरण्याचे धाडस करू नये. आपण कितीही चांगले जलतरणपट्ट असले तरी अशा ठिकाणी पोहण्याचे टाळावे. नदी, नाले, दुथळी वाहत असतात तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते अशा वेळी चुकूनही तो पुल किंवा रस्ता चालत किंवा गाडी मधुन ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. आवश्यक खबरदारी घेवून स्वतःची त्याच प्रमाणे आपल्या कुटूंबियांची व मित्र परिवाराची अशा ठिकाणी आवश्यक काळजी घ्यावी व प्रशासनकडून निर्गमित होत असलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे. जिल्ह्यातील समस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर दूरध्वनी क्र. 0712-2562668येथे संपर्क साधावा.
