श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital media services.
महादुला-कोराडी /नागपूर : 21 जुलै 2025
नागपूर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत टी पांईंटवरील बहुचर्चित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ई – लायब्ररी चे काम ठरलेल्या डिझाईन प्रमाणे होत नसुन तिथे निक्रृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने स्लैब गळत असल्याचा आरोप काही दिवसांपुर्वी Vansh News यु ट्युब चैनल वर माजी सभापती सचिन मानवटकर व माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी केला होता. यासंबंधाने Vansh News ने बातमी करताबरोबर जिल्हाधिकारी प्रशासन खळबळुन जागे झाले.Vansh NEWS चैनल च्या बातमीचा Impact असा झाला की आज सकाळी नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर नागपुर जिल्हा समा अधिकारी व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्मारकाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी आज येत असल्याची खात्रीलायक सुत्रांकडुन माहिती पुढे येत आहे.


आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या बांधकामात कोणताही समजोता करणार नसुन या स्मारकाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांवर ब्लैकलिस्ट ची कारवाई तसेच कामांवर कोणताही watch न ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सभापती सचिन मानवटकर व माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी मागणी केली होती हे विशेष.
आज नागपुर चे जिलाधिकारी विपिन इटनकर व नागपुर च पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महादुला नगरपंचायत येथील टी पांईंटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भेट देणार असुन या कामाची सखोल चौकशी व्हावी अन्यथा केवळ फोटोसेशन करण्यासाठी सेल्फीज घेऊ नये. चार – 5 कोटी रुपयांचे स्मारक व ई लायब्ररी निर्माणाचे काम उत्क्रृष्ट व्हावे अशी आंबेडकरी समाजाची भावना मागणी आहे.
महादुला नगरपंचायत येथे शेकडो कोटी रुपयांचे विकासकामे झाली पण या कामाची गुणवत्ता कधीच जनप्रतिनिधी व स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने तपासली नाहीत. शेकड़ो कोटीचे निक्रृष्ट दर्जाचे सिमेंट रोड, सार्वजनिक शौचालये? RO स्थापित केले पण जनतेसाठी कुचकामी ठरले उद्घाटनापुर्वीच सार्वजनिक शौचालयातील साहित्य चोरी गेले. मागील 10 वर्षापासुन महादुला नगरपंचायत वर लक्ष दिले असते तर आज अचानक खळबळुन जागे व्हायची स्थानिक आमदारांवर वेळ आली नसती. त्यांनी वेळोवेळी प्रत्येक कामांवर, भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांच्यावर अंकुष लावला तर महादुला येथील जनता स्थानिक आमदारांचे स्वागत नक्की करेल.
VANSH NEWS चैनल नेहमी दलित पिडित व वंचित नागरिकांच्या हक्क. अधिकार व समस्यांसाठी नेहमी आवाज उचलतो.

