पुरस्कार आई वडिलांसह मॅडम नोरीको ओगावा यांना समर्पित.
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News digital media services
कामठी:11/06/2025
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यस्तरीय शाहु-फुले-आंबेडकर पारितोषिके करिता कामठीच्या ओगावा सोसायटीची निवड करण्यात आली होती. त्यानुसार हा पुरस्कार ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखाताई कुंभारे यांना मुंबई येथे मंगळवार दि. 10 जुन 2025 रोजी पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय सिरसाट, संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानाने प्रदान करण्यात आला.
सन 1996 मध्ये ओगावा सोसायटीची स्थापना माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी केली होती. जपान येथील नोरीको ओगावा यांच्या कार्याचा ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्यावर प्रचंड मोठा प्रभाव आहे. त्यांच्याच आशीर्वादाने आपण कामठीत जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारू शकलो अशीही कृतज्ञता ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी पुरस्कार सोहळ्यानंतर व्यक्त केली आहे.


ओगावा सोसायटीने विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसची निर्मिती केली. ड्रॅगन पॅलेस हे शांती, मैत्री व मानव कल्याणकारी विचाराचे केंद्र म्हणुन जगप्रसिध्द आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटर पाहुन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशंसा केली होती. दरम्यान, ओगावा सोसायटीतर्फे ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली आहे. ओगावा सोसायटीद्वारे वर्षभर अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविल्या जातात. ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात ओगावा सोसायटी पूर्णपणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला समर्पित आहे. ओगावा सोसायटीच्या कार्याची दखल घेत शाहु-फुले-आंबेडकर पुरस्कार देण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालयाने घेतला.
सामाजिक कार्य करायचे असेल तर आईवडिलांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरते, मला माझी आई नलीनीताई नारायणराव कुंभारे आणि वडील दादासाहेब कुंभारे यांचे पाठबळ नेहमीच राहिले आहे. शिवाय जापान येथील गोरीको ओगावा यांनीही मला भरीव असे सहकार्य केले. त्यांच्याच प्रेरणेने कामठीत ड्रॅगन पॅलेस टेम्पल उग्ने झाले. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यस्तरीय शाहु-फुले-अबिडकर पुरस्कार मी आईवडिलांसह मॅडम नोरीको ओगावा यांना समर्पित करीत असल्याची भावना ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या शिल्पकार व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केली.
