श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
बोखारा/नागपूर : 19 एप्रिल 2025
शंकरपट ही तिनशे वर्षांपूर्वी ची विदर्भाची परंपरा आहे . शंकरपट म्हणजे बैलांच्या शर्यती. शंकर पट म्हणजे बळीराजा चा म्हणजेच आपल्या जगाच्या पोशिंद्याचा खेळ आहे. मुख्यतः या खेळा चे खूप प्रकार विभागानुसार पडतात पश्चिम महााष्ट्रातील पुणे , सातारा,सांगली,नगर, नाशिक या ठिकाणी या खेळाला बैलगाडा शर्यत असे ही संबोधले जाते आणि नियम पण वेगवेगळे असतात . बैलगाडा शर्यत मध्ये एकाच वेळी जास्तीत जास्त 9 गाड्या सोडतात तर शंकरपटात एका वेळी एक किंवा दोन गाड्या सोडतात एक गाडी सोडतांना ती स्पर्धा सेकांदावर चालते आणि दोन गाड्या सोडल्यास पहिल्या गाडी ला विजयी करार दिला जातो.. शंकरपट मोठ्या प्रमाने विदर्भातील उमरखेड,यवतमाळ,वर्धा , अमरावती,बुलढाणा या क्षेत्रात जास्त बघण्यास मिळते आणि इथले शेतकरी प्रमुख्याने शंकरपटाची छकडी गाडी तयार करताना सज्ज दिसतात. वार्षिक यात्रे निमित्त हा खेळ भरवला जातो हा खेळ नाही तर एक शेतकऱ्याची परंपरा आहे. शेतकरी भावांचा बहिणींचा आवडता छंद म्हणजे शंकरपट.

रामटेक चे खा. शामकुमार बर्वे यांची बैलजोडी शंकरपटात भाग घेणार
नागपूर जिल्ह्यातील बोखारा फेटरी सर्कल अंतर्गत 40 वर्षानंतर हा पट स्वर्गीय श्यामदेव राऊत माजी जि.प अध्यक्ष यांच्या स्मृती प्रित्यर्थ 19 एप्रिल व 20 एप्रिल ला आयोजन केलेला आहे ,या पटांमध्ये सहभाग होणाऱ्या बैल जोडी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या आहे
शनिवार दिनांक 19 एप्रिल ला सकाळी उद्घाटन करून बैलपट ची सुरुवात झाली ,20 एप्रिल ला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुनील केदार ,खासदार श्यामकुमार बर्वे ,जि. प. माजी अध्यक्ष मुक्ता कोकड्डे , जि प माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत, पंचायत समिती माजी सभापती रूपाली मनोहर ,ममता धोपटे, प्रीती ताई अखंड अपर्णा राऊत व इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
या शंकरपटाची विशेषता म्हणजे खासदार शामकुमार जी बर्वे यांची बैल जोडी सुद्धा या पटात सहभागी होणार आहे.
