श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital media services.
महादुला-कोराडी /नागपूर – 29 जुलै 2025
आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त बौद्ध धार्मिक स्थळ बुद्धगया ब्राम्हणांचया तावडीतुन मुक्त व्हावे यासाठी संपूर्ण भारतभर व जगात बौद्ध उपासक /उपासिका, व बौद्ध भिख्खुंच्या उपस्थितीत लाखोंच्या संख्येने धरणा आंदोलन करणाऱ्या बौद्ध धम्मगुरु भंते विणाचार्य यांनी बिहार येथे भव्य आंदोलन केले होते. तेथील बिहार सरकारने कटकारस्थान करुन भंते विणाचार्य यांना तब्बल दोन महिने तुरुंगात टाकले होते. परंतु त्यांची नुकतीच जामीनावर सुटका झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण देशभरात विविध कार्यक्रम व रैलीच्या माध्यमातून बौद्ध समाजात जनजागृती सुरु आहे.


त्याच अनुषंगाने येत्या 14 आँगस्ट 2025 रोजी महादुला-कोराडी येथील शताब्दी बहुउद्देशीय संस्थेतर्फे बुद्धगया मुक्ती आंदोलनाचे प्रणेते बौद्ध धम्मगुरु भंते विणाचार्य यांचा सत्कार व त्यांच्या नेतृत्वाखाली महादुला-कोराडी येथे भव्य धम्मध्वज यात्रेचे आयोजन माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी केले असुन बौद्ध धर्मियांनी जास्तीत जास्त संख्येने या यात्रेत सहभागी होऊन बौद्ध अस्मितेच्या बुद्धगया आंदोलनास एकजुटीने समर्थन देऊन आपले योगदान द्यावे अशी विनंती शताब्दी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रत्नदीप रंगारी यांनी केले आहे.





































