श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
कामठी/नागपुर : 1 मे 2025
उद्या नागपुर जिल्ह्यातील कामठी शहरात कामठी – कुही चे माजी आमदार स्व. यादवराव भोयर यांच्या पुर्णाक्रृती पुतळ्याचे अनावरण कांग्रेस नेत्यांच्या भरगच उपस्थितीत उद्या दि. 2 मे 2025 रोजी नविन कामठी येथील यादवराव भोयर शैक्षणिक परिसर येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कांग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार तर प्रमुख उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील तर कार्यक्रमाला आ.विजय वडेट्टीवार (विधीमंडळ पक्ष नेता), माजी ग्रृहमंत्री अनिल देशमुख, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, खा. शामकुममार बर्वे (रामटेक) , खा. अमर काळे (वर्धा), माजी पालकमंत्री आ. नितीन राऊत (उत्तर नागपुर), आ. विकास ठाकरे (प. नागपूर), आ. अभिजित वंजारी (नागपूर पदवीधर मतदारसंघ), आ. संजय मेश्राम (उमरेड नागपुर), रमेश बंग (माजी मंत्री),माजी मंत्री राजेंद्र मुळक, गिरिश पांडव, किशोरीताई भोयर (अध्यक्ष स. पा. शि. सं.कामठी) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

सदर कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती श्री. सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेचे सचिव तथा कांग्रेस नेता सुरेश भोयर यांनी केली आहे.
नागपुर जिल्ह्यातील राजकारणात एक मनमिळावू व निष्ठावंत कॉंग्रेसचा नेता म्हणून माजी आमदार यादवराव भोयर यांची नागपूर जिल्ह्यात ओळख होती.
त्यांनी कामठी तालुक्यात शिक्षण संस्थांचे जाळे विणले. त्यांनी महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्षपदही भूषविले होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून यादवराव भोयर ओळखले जात होते. कॉंग्रेसचा साधा कार्यकर्ता म्हणून येरखेडा गावातून राजकीय जीवनाला सुरूवात करणाऱ्या यादवराव भोयर यांनी नागपुर जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. कामठी-कुही क्षेत्राचे माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य लघुद्योग व रोजगार हमी योजना महामंडळचे अध्यक्षपद ही त्यांनी भुषविले होते. यादवराव भोयर हे 1985 ते 1995 या कालावधीत कॉंग्रेसकडून कामठी-कुही विधानसभेवर निवडून आले होते. काही वर्षे ते नगर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्षही राहिले. त्यांनी श्री. सदाशिव राव पाटील शिक्षण संस्थेची स्थापना केली. कामठी व भंडारा जिल्ह्यात अनेक शाळा व महाविद्यालये सुरू केले. विद्यार्थ्यांना विविध शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती.
उद्या नागपुरात होणाऱ्या कांग्रेस नेत्यांच्या भरगच्च उपस्थितीमुळे नागपूर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघेल. या कार्यक्रमाकडे खासकरुन भाजप नेत्यांचे ही लक्ष लागणार आहे.
