पुन्हा संचालक मंडळ बहाल, हितचिंतकांनी दिल्या शुभेच्छा
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
मुंबई : 28 सप्टेंबर 2025
एशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ व आर्थिक उलाढाल असणाऱ्या मुंबई क्रृषी उत्पन्न बाजार समिती वर अनियमितता व भ्रष्टाचार चे आरोप लावून भाजप सरकारने बरखास्त केले होते. परंतु देशातील नामांकित सर्वोत्कृष्ट सहकार क्षेत्रातील अग्रगण्य मुंबई क्रृषी उत्पन्न बाजार समिती वर कब्जा करण्यासाठी षडयंत्र करुन बदनाम करण्याचा भाजप नेत्यांनी केलेला प्रयत्न मुंबई APMC चे उपाध्यक्ष व विदर्भातील जेष्ठ कॉग्रेस नेता हुकुमचंद आमधरे यांनी हाणुन पाडला.
हुकुमचंद आमधरे हे स्वतः राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध मुंबई हायकोर्टात गेले व रिट याचिका दाखल केली. त्यांवर दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई APMC चे पुर्वीचे संपूर्ण संचालक मंडळ बहाल केले. राज्यातील राज्य सरकारला हा मोठा हादरा असुन मुंबई क्रृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष हुकुमचंद आमधरे यांचे अभिनंदन करीत त्यांच्या सहकाऱ्यांनी व हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2025 मध्ये प्रभू पाटील होते, परंतु त्यांची निवड फक्त एक वर्षासाठी होती, कारण सप्टेंबर 2025 मध्ये बाजार समितीचे संचालक मंडळ विसर्जित करण्यात आले. प्रभु पाटील हे शिंदे गटाचे आहेत.
नागपुरातील काही APMC वर ही अशाच प्रकारे प्रशासक राज्य सरकारने बसवला होता.राज्यातील भाजप नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतांचे राजकारण करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवत असुन सत्तेसाठी हपापलेले दिसत आहेत. नागपुरातील APMC वरील प्रशासक हटविण्यात कांग्रेस नेते यशस्वी झाले. महाविकास आघाडीसाठी हा महत्त्वाचा विजय मानला जातो.



































