श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
येरखेडा /नागपुर : 17 नोव्हेंबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील कामठी तालुक्यात असलेल्या येरखेडा नगरपंचायत चे नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव असुन कांग्रेसने याठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी यांना निवडणुक रिंगणात उतरवले आहे.
कामठी विधानसभेतील नेते सुरेश भोयर यांनी परत एकदा सुमेध रंगारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. गत येरखेडा ग्रा पं. निवडणुकीत माजी पं. सदस्य सुमेध रंगारी यांच्या आई सरिताताई रंगारी ह्या थेट जनतेतुन सरपंच म्हणून निवडुन आल्या होत्या. सरपंच म्हणून येरखेडा येथे उत्क्रृष्ट काम करणाऱ्या सरिता रंगारी यांच्याकडुन भाजप उमेदवाराचा झालेला पराभव भाजप नेत्यांना जिव्हारी लागला. बौद्ध समाजाच्या महिला सरपंचांना येरखेडा सरपंच पदावर राहणे हे भाजपा नेत्यांना देखवले नाही म्हणून येरखेडा ग्रा पं. ला नगरपंचायत मध्ये रुपांतर केले आणि नगरपंचायत येथे प्रशासक नेमणे यामुळे कांग्रेस नेते आक्रामक झाले. त्यांनी याविरुद्ध कोर्टात आवाज उचलला. परंतु वाढत्या लोकसंख्येचा बहाणा देत येरखेडा शहराला नगरपंचायत चा दर्जा बहाल केला आणि नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली.
कांग्रेस कडुन माजी पं. सदस्य सुमेध रंगारी व माजी ग्रा पं. सदस्य अनिल पाटील यांनी कांग्रेस कडे उमेदवारी मागितली. शेवटी पक्षाने येरखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी सुमेध रंगारी यांची उमेदवारी नगराध्यक्ष पदासाठी पक्की केली.

सुमेध रंगारी व कांग्रेस चे 17 प्रभागामधील उमेदवार आज येरखेडा नगरपंचायत कार्यालयात आपले उमेदवारी अर्ज कांग्रेस नेता सुरेश भोयर यांच्या उपस्थितीत दाखल करणार आहेत.
येरखेडा नगरपंचायत निवडणुक भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिष्ठेची केली आहे या ठिकाणी भाजप चे मेळावे, बैठका घेत संघठनात्मक बांधणी वर त्यांनी लक्ष घातले. कांग्रेसचे समर्थकांना भाजप मध्ये सुद्धा त्यांनी आणले. सुरेश भोयर यांचे कट्टर समर्थक असलेले प्रशांत (बाल्या) काळे, पत्रकार सतिश डहाट यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. परंतु कांग्रेसवर कोणताच परिणाम झाला नाही. याठिकाणी भाजपकडून माजी ग्रा. पं. सदस्य राजकिरण बर्वे व सतिश डहाट या दोघांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितली आहे. भाजप ने नगराध्यक्ष पदासाठी अजुनही नाव जाहीर केले नाही. परंतु राजकिरण बर्वे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. आज नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज याठिकाणी भाजपकडून कोण उमेदवारी दाखल करतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.




































