श्री सुनील उत्तमराव साळवे
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
महादुला : 17 नोव्हेंबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील महादुला नगरपंचायत निवडणुक 2025 साठी कांग्रेसतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुषमा रत्नदीप रंगारी ह्या आपला उमेदवारी अर्ज आज 17 नोव्हेंबरला महादुला नगरपंचायत कार्यालयात दाखल करणार असल्याची माहिती सुत्राकडुन मिळत आहे. त्यांच्यासोबत कांग्रेसचे अन्य 17 प्रभागामधील उमेदवार ही आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी कांग्रेस चे स्थानिक नेते रत्नदीप रंगारी व सचिन मानवटकर हे दोघेही एकत्र आलेले दिसत आहे.माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी व माजी सभापती सचिन मानवटकर हे सातत्याने भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आक्रमक होत जनतेत जनजागृती करीत आहेत. याठिकाणी भाजप स्वबळावर जरी निवडणुक लढवित असली तरी भाजप साठी यावेळी ही निवडणुक पाहिजे तेवढी सोपी राहिली नाही. एंटी इन्कबसीचा फटका भाजपला बसेल अशी राजकीय गोटात चर्चा सुरू आहे. महादुला नगरपंचायत परिसरात खेळाचे मैदान नाही भकास गार्डन, ग्रीन जीम नाही, समाजभवनाची दुरावस्था,बंद असलेले आरोग्य केंद्र या मोठ्या बिकट समस्या यामुळे जनता सध्या त्रस्त झाली आहे. महादुला नगरपंचायत शहरात विकासासाठी आलेले 150 कोटी रुपये कुठे गेले? असा आरोप कांग्रेसचे नेते करतात व त्याचबरोबर महादुला नगरपंचायत चे आँडिट लावा अशी मागणी करुनही भ्रष्टाचारावर पालकमंत्री बावनकुळे यांचे मौन (चुप्पी) कदाचित भाजप च्या सत्तेसाठी डोकेदुखी ठरु शकते. आताची निवडणुक माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांच्या राजकीय अस्तित्वाची निवडणुक आहे. कांग्रेस पक्षांतर्गत गटबाजी चा फटका रत्नदीप रंगारी यांना बसला. यावेळी कांग्रेस अंतर्गत असंतुष्ट मोजक्या प्रमाणात आहे.
माजी मंत्री सुनील केदार यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे रत्नदीप रंगारी हे सातत्याने त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. जात, धर्म असा कोणताही भेदभाव न करता त्यांच्याकडे मदतीसाठी गेलेल्या व्यक्तीसाठी रत्नदीप रंगारी हे सढळ हाताने मदत करतात. शालेय मुलामुलींना गणवेश, शालेय साहित्य वाटप, सायकल वाटप शिक्षण व आजारी व्यक्तींना उपचारासाठी आर्थिक मदत याकरीता रत्नदीप रंगारी यांचेकडे दलित, बहुजन समाजातील गोरगरिब जनता आशेने बघते. रत्नदीप रंगारी यांच्या सामाजिक योगदानासाठी त्यांच्या पत्नी सौ. सुषमा रंगारी ह्या सुद्धा खांद्याला खांदा लावून तेवढ्याच पोटतिडकीने कार्य करतात. त्यामुळे आज महादुला कोराडी परिसरात निःस्वार्थ द्रृष्टीने समाजसेवा करणारे नेत्रृत्व म्हणून बघितले जाते.
सन 2019 च्या नगरपंचायत निवडणुकीत अवघ्या 300 मतांनी पराभव होऊनही रत्नदीप रंगारी यांनी सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या समाजसेवेचा वसा रेटुन धरला. महादुला नगरपंचायत चा मागील 10 वर्षापासुन चा रखडलेला विकास, तथा नगरपंचायत मध्ये ठेकेदारांची वाढलेली दादागिरी व भ्रष्टाचार याला थांबविण्यासाठी महादुला नगरपंचायत च्या अध्यक्षपदासाठी सौ. सुषमा रत्नदीप रंगारी ह्या एकमेव पर्याय आहेत अशी नागरिकांत चर्चा आहे.




































