बाबु हरदास एल.एन. यांना 87 मीटर लांब ध्वजावर स्वाक्षरी करून आगळीवेगळी श्रद्धांजली
श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर : 12 जानेवारी 2026
”जय भीम‘ या क्रांतीकारी अभिवादनाचे जनक, थोर समाजसेवक बाबु हरदास एल.एन. यांच्या 87 व्या स्मृतिदिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस परिसर एका ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार ठरला. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी 87 मीटर लांबीच्या महाकाय ध्वजावर ‘जय भीम’ लिहून आणि स्वाक्षरी करून शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि मान्यवरांनी त्यांना अनोखी व भावपूर्ण आदरांजली वाहिली.
या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर, पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी बाबु हरदास यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण केले.

असा रंगला सोहळा
बाबु हरदास एल.एन. यांचा हा 87 वा स्मृतिदिन असल्याने, 87 मीटर लांबीचा विशेष ध्वज (Flag) तयार करण्यात आला होता. या प्रदीर्घ ध्वजावर मान्यवरांसह उपस्थित शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी स्वहस्ते ‘जय भीम’ लिहून अभिवादन केले. संपूर्ण ड्रॅगन पॅलेस परिसर यावेळी ‘जय भीम’ च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
या सोहळ्याला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने
अजय कदम, नगरसेवक नियाज अहमद, नगरसेवक आकाश बोकरे, दिपंकर गणविर, उदास बंसोड, अंकुश बांबोर्ड, अनुभव पाटिल, दिपक सिरिया चंदु लांजेवार, विलास बंसोड माजी नगरसेविका सावला सिंगाडे, रेखा भावे, सुकेशीनी मुरारकर, अनमोल डोंगरे, यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातील देवेंद्र जगताप (मुख्याध्यापक, हरदास विद्यालय), अंबरीन फातीमा (प्रिन्सिपल, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल), सतिष कसरे (मुख्याध्यापक, हरदास प्राथमिक शाळा), राजेश गजभिये (मुख्याध्यापक, दादासाहेब कुंभारे विद्यालय, नेरी), सागर भावे (प्राचार्य, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र), प्रा. राष्ट्रपाल मेश्राम (समाजकार्य विद्यालय)लोकसहभागातून नवा आदर्श विद्यार्थ्यांचा उत्साह आणि नागरिकांची मोठी संख्या यामुळे या कार्यक्रमाला एका जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले होते. बाबु हरदास यांनी दिलेल्या ‘जय भीम’ या मंत्राने दलित शोषितांमध्ये जी चैतन्यशक्ती फुंकली, त्याचे प्रतिबिंब या 87 मीटर लांब ध्वजावर उमटलेल्या साक्षऱ्यांमधुन पहायला मिळाले.
































