श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
कोराडी /नागपूर:15 एप्रिल 2025
नागपूर – ओबेदुल्लागंज महामार्ग क्रमांक 69 चे काम पुर्ण झाल्यानंतर विधान परिषद निवडणुकीमुळं जिल्ह्यात आचारसंहिता लागली होती. त्यामुळं उद्घाटन करता येत नसल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उद्घाटनाची वाट न पाहताच या मार्गाचा वापर सुरू केला. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलावरून ये-जा सुरू करण्यासाठी बॅरिकेट्स हटविले. 2015 मध्ये उड्डाणपूल नांदाजवळ बनविण्यात येणार होता. परंतु, 2018 च्या शेवटी कोराडी मंदिराजवळ उड्डाणपूल बनविण्याचे निश्चित झाले होते . या उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने लोकांना बराच त्रास व्हायचा. चक्कर मारून जावे लागत होते. अशातच
उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत होती. या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर जनतेची अडचण व विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता बघता कांग्रेसचे रत्नदीप रंगारी यांच्या नेतृत्वाखाली कोराडी हायवेवरील वाहतुकीसाठी उड्डाणपुलावरील वाहतुक नोव्हेंबर 2021 मध्ये सुरू केली.
6 लेनचा मार्ग कोराडी येथे बनल्यानंतर सर्विस रोडवर दुकानदारांचे अतिक्रमण यामुळे दरदिवशी रहदारीला त्रासदायक व्हायचा. कारेमोरे संकुल चौकात तर नेहमी अपघात घडतात. वारंवार राष्ट्रीय महामार्ग अँथारिटी ला तक्रार करुनही महादुला कोराडी येथील अतिक्रमण हटाओ कारवाई केली नाही. त्यामुळे या हायवेवरील सर्विस रोडवर वाहतुकीची कोंडी होऊन कित्येक अपघातात अनेकांचे बळी गेले..
राज्याचे महसुलमंत्री यांचेकडुन या परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी अपेक्षित प्रयत्न न झाल्याने येथील जनता हवालदिल झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग अँथारिटी ने त्यावेळी महामार्गाच्या मध्यभागातून दुतर्फा 65 फुटावर मार्किंग केली असतांना दोन्ही सर्विस रोड पासुन दुतर्फा 15-20 फुट दुकानदारांचे अतिक्रमण / शाँशिंग कॉम्प्लेक्स, /इमारतींचे अतिक्रमण हटविले गेले नाही . परंतु सर्विस रोडवरच जवळपास 10 फुट लोकांच्या दुचाकी /चार चाकी वाहने पार्किग केल्याने फुटपाथ कुठे आहे? किंवा सर्विस रोडची ड्रेनेज नाली दुकानदारांनी गडप केली आहे. रस्त्याने पायी चालणे सुद्धा कठिण झाले आहे. अशा परिस्थितीत अतिक्रमण हटाओ चा मुद्यांवर येथील जनता पुन्हा आंदोलनाच्या भुमिकेत आहे. राष्ट्रीय महामार्ग अँथारिटी ने येथील अतिक्रमणे हटविण्यात कुचराई केल्याने व जनप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे येथील जनता लवकरच अतिक्रमण हटाओ भुमिकेसाठी येत्या काही दिवसांत आंदोलन करणार आहेत.
राज्याचे महसूलमंत्री तथा नागपुर चे पालकमंत्री यांचे कोराडी त निवास आहे ते दरदिवशी महादुला-कोराडी येथील सर्विस रोडने नेहमी येजा करतात परंतु त्यांना येथील रहदारीत अतिक्रमणांचा अनुभव येतो की नाही, असे जनता आज विचारत आहे.


अपेक्षा आहे की महसुलमंत्री तथा नागपुर चे पालकमंत्री आता तरी येथील दुकानदारांचे अतिक्रमणाला राजकीय संरक्षण न देता अतिक्रमणे जरुर हटवतील.
