श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
कोराडी /नागपूर : 20 मार्च 2025
आज सकाळी महाजेनको कोराडी 210 मेगावाट वीज प्रकल्पातील सीएचपी रेल्वे लाईन विभागात झालेल्या अपघातात कार्यरत प्रदीप मेश्राम नामक कंत्राटी कामगार हा गंभीर जखमी झाल्याची खात्रीलायक सुत्रांकडुन माहिती मिळाली.
कंत्राटी कामगार प्रदीप मेश्राम रा. सिद्धार्थ नगर वार्ड क्रमांक 9 महादुला नगरपंचायत येथील निवासी असुन तो सहा महिन्यापुर्वी मे. एम. एफ. जैन नामक कांन्टैक्टर कडे रोजंदारी कामगार म्हणून त्याच्या मोठ्या वडिलांच्या जागेवर लागला होता अशी माहिती मिळाली आहे. आज सकाळी रेल्वे लाईन विभागात काम करतांना तो हाय टेंशन लाईन च्या संपर्कात आल्याने तो जागीच कोसळला. त्याला अतिताक्काळ कोराडी महाजेनको वीज प्रकल्पातील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी नेले. तेथुन त्यास अँलेक्सिस मध्ये नेल्याचे समजले. परंतु त्यांनी त्याला उपचारासाठी घेतले नसल्याने त्याला नागपुरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. त्याची प्रक्रृती आता चिंताजनक असल्याचे कळते.
