श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News digital media service
नागपुर : 4 जुन 2025
मे महिन्यात मान्सून पुर्व मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. भर उन्हाळ्यात काही नद्या अक्षरशः तुडुंब भरल्या होत्या. या अवकाळी पावसाचा फटका नागपुरच्या पवित्र दीक्षाभुमीला सुद्धा बसला.


1 वर्षापुर्वी दीक्षाभुमीचे सौंदर्यीकरण करण्याच्या नावाखाली अंडरग्राऊंड पार्किंग साठी मोठमोठे गड्डे जेसीबी ने दीक्षाभुमीच्या भोवताल केले होते! त्यात पावसाचे पाणी जमा व्हायचे. आता तर दीक्षाभुमीच्या सभोवताल असलेले जुने बांधकाम जीर्ण झाल्याने दीक्षाभुमीचे आत पावसाचे पाणी येऊ नये यासाठी दीक्षाभुमी स्मारक समितीने ताडपत्रींचा सहारा घेतल्याचे दिसून येत आहे. जिथे महाराष्ट्र शासनाने दीक्षाभुमीच्या विकासासाठी 200 कोटी रुपये दिल्याची घोषणा करीत आंबेडकरी समाजाची मते घेतली. आता त्याच दीक्षाभुमीला पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्रीचा उपयोग करावा लागतो ही आंबेडकरी समाजाची शोकांतिका आहे. इतके दिवस कधीच दीक्षाभुमी परिसरात ताडपत्रीचा उपयोग कधीच झाला नव्हता. तिथे महाराष्ट्र सरकारच्या व्यावसायिक धोरणाचा फटका आता आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख केंद्राला बसत आहे.
आंबेडकरी स्मारकाची अशी दुर्दशा बघुन नागपुरातील आंबेडकरी चळवळीतील नेते,स्मारक समिती ,भिखखु संघ, साहित्यिक महाराष्ट्र शासनाला दीक्षाभुमी चे वास्तु जतन साठी केव्हा पुढाकार घेणार? अशी आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सवाल आहे.


