श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी/नागपुर : 26 नोव्हेंबर 2025
भारतीय संविधान दिनाच्या हीरक महोत्सवानिमित्त बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे दि 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता भव्य संविधान जागर रॅली चे आयोजन करण्यात आले आहे रिपब्लिकन आंदोलनाच्या परंपरेला साजेसे आणि समाज जागृतीचा संदेश देणारे हे ऐतिहासिक आयोजन माजी मंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका ॲड. सुलेखाताई कुंभारे व सामाजिक कार्यकर्ते अजय कदम यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे जागतिक स्तरावर निर्माण करण्यात येणारी संविधानाची प्रतिकृती या रॅलीत ठेवण्यात येणार आहे हे या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

या रॅलीच्या मार्गावरील प्रत्येक बुद्ध विहारास संविधानाची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत लोकशाहीचे मूल्य पोहोचवण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येणार आहे.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रॅलीचा प्रारंभ होईल. त्यानंतर रॅली जयस्तंभ चौकात होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व त्यांना मानवंदना देऊन ही रॅली पुढे निघेल रॅलीचा मार्ग आणि प्रमुख स्थळांवरील अभिवादन कार्यक्रम रॅलीचा मार्ग शहरातील प्रमुख बुद्ध विहार चौक मधून विविध ठिकाणी माल्यार्पण, अभिवादन आणि संविधान जागर संदेश देत पुढे सरकणार आहे.
मुख्य स्थळे पुढीलप्रमाणे
मोटर स्टैंड बाबू हरदास एल. एन. यांच्या पुतळ्याला माल्यार्पण, मोटर स्टैंड, हैदरी चौक, हरदास नगर हरदास बुद्ध विहार, करुणा बुद्ध विहार, हमालपुरा, दुर्गा चौक, जयस्तंभ चौक मार्गे, नाग बुद्ध विहार गवलीपुरा, सम्यक संबोधी बुद्ध विहार रमा नगर, बोधीसत्व बुद्ध विहार कामगार नगर अंगुलीमाल बुद्ध विहार कामगार नगर, यशोधरा बुद्ध विहार कामगार नगर (मैदान), प्रज्ञाशील बुद्ध विहार जय भीम चौक, सिद्धार्थ बुद्ध विहार जय भीम चौक, चंद्रमणी बुद्ध विहार जय भीम चौक राहुल बुद्ध विहार जय भीम चौक, सम्राट अशोक बुद्ध विहार खतीजाबाई शाळेजवळ, प्रबुद्ध बुद्ध विहार नया गोदाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला माल्यार्पण नया गोदाम, कुंभारे कॉम्प्लेक्स मार्गे सिद्धार्थ नगर कचरीपुरा, तथागत गौतम बुद्ध विहार नया बाजार, आम्रपाली बुद्ध विहार कोळसा टाल, तथागत बुद्ध विहार गांधी नगर कसाईपुरा, अनागारिक बुद्ध विहार जुनी खलासी लाईन, अशोका बुद्ध विहार अशोक नगर, भीम बुद्ध संदेश विहार, जे.पी नगर, धम्म दीप संघ बुद्ध विहार नया नगर, जेतवन बुद्ध विहार मोदी पडाव, नागसेन बुद्ध विहार, नागसेन नगर, रमाई बुद्ध विहार खलासी लाईन, धम्म साधना संघ बुद्ध विहार अविनाश शाळेजवळ, चंद्रमणी नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण, त्रिरत्न बुद्ध विहार चंद्रमणी नगर, गौतम नगर बुद्ध विहार गौतम नगर, दादासाहेब कुंभारे एकता मंच कुंभारे कॉलनी, संघमित्रा बुद्ध विहार लुंबिनी नगर, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रात रॅलीचा समारोप होईल.
कामठी शहरातील संपुर्ण बुद्ध विहारांचा समावेश असलेली ही ऐतिहासिक संविधान जागर रॅली दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र, कामठी येथे उत्साहात समारोप होणार आहे.
या प्रसंगी ॲड.सुलेखाताई कुंभारे या संविधान मूल्यांची जपणूक सामाजिक ऐक्य आणि लोकशाहीतील समानतेचा संदेश देणार आहेत शहरातील विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते, युवक युवती तसेच नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीला भव्य प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या रॅलीमध्ये बहुजन रिपब्लिकन एकता मंचाचे विविध प्रभागातून रिंगणात असलेले खालील उमेदवारांचा समावेश राहणार आहे दिपंकर गणवीर, सागर चंद्रशेखर भावे, स्नेहलता विनोद गजभिये, अनुभव दिलेश्वर पाटील, नियाज अहमद कुरेशी, प्रवेशकुमार मिलींद चिमनकर, राजू नामदेव भागवत, अनमोल सिध्दार्थ डोंगरे, ईशरत फातमा अब्दुल वासीम, श्रध्दा राहुल यादव, अलका विजय तांबे, अजय नामदेव डोंगरे, ईशा तारेंद्र गडवाल, राजेंद्र एकनाथ रामटेके, आकाश प्रदिप भोकरे इत्यादी उपस्थित राहणार आहेत.




































