श्री.सुनील उत्तमराव साळवे.
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Portal media services.
कामठी/नागपुर – 5 आँगस्ट 2025
3 आँगस्ट फ्रेंडशिप डेच्या रात्री कामठी रोडवरील इडन ग्रीन्स रिसार्ट येथे ‘फ्रेंड्स अँड बियॉंड’ पार्टी होती या पार्टीत रविवारी मोठा हंगामा झाला. दोन गटांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळताच जुनी कामठी पोलिस घटनास्थळी आले, मात्र, परिस्थिती शांत करण्याऐवजी आयोजकाचा उर्मटपणा कामठी पोलिसांना अनुभवायला आला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आयोजक एका पोलिस अधिकाऱ्याला उघडपणे धमकावताना दिसतो . एका आयोजकाने तर थेट नागपुर च्या पालकमंत्र्यांचे नाव घेत, ” मी सीधा बावनकुळे से बात करता हु” असे बोलत पोलिसांवर रौब झाडतांना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
यावर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली , आम्ही पोहोचलो तेव्हा वाद सुरु होता. संगीत बंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयोजकाने सरळसरळ पालकमंत्र्यांचे नाव घेऊन राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
👆👆👆
हाच तो सोशल मीडिया पर वायरल वीडियो एखाद्या राजकीय नेत्याचा जवळचा सांगुन पोलिसांसोबत उर्मटपणा केल्याने पोलिसांवर चूपचाप निघुन जाण्याची वेळ नामुष्की ओढवली. रात्री बेरात्री रिसोर्ट, लांसवर रारु संगित MD ड्रग्ज पार्टी नागपुर जिल्ह्यात सुरु आहेत, तर दुसरीकडे कित्येक होटल लाँजवर देहव्यापार सुरु आहे. यातील कित्येक अवैध व्यावसायिक हे राजकीय नेत्यांशी जवळीक सांगुन पोलीस कारवाईपासून स्वतःचा बचाव करतात. पोलिसांवर दबाव आणत असल्याने राजकीय नेत्यांच्या साठगाठीमुळेच गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. बेकायदेशीर रित्या होत असलेल्या अशा पार्टी आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे त्यासाठी नागपुर शहर व ग्रामीण पोलिसांनी संघठितपणे कडक पाऊले उचलण्याची गरज आहे.


































