श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Portal media services.
कोथरुड /पुणे :4 आँगस्ट 2025
पुणे जिल्ह्यातील कोथरुड घटनेत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांचे पत्र आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीत तथ्य नसल्याने आणि कोणतेही पुरावे नसल्याने गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजूनही अट्रोसिटी कायद्याचे महत्त्व, पीडित महिलांचा त्रास समजत नाहीये. गेल्या 15 तासांपासून पीडित तरुणी पोलीस आयुक्तालयात एफआयआर नोंदवावी म्हणून लढताय. तरीसुद्धा पोलिस प्रशासन गुन्हा नोंदवायला तयार नाही.
पोलिसांना एवढी भीती कशाची? पोलिस आरोपींना पाठीशी का घालताय? सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतांना पुणे पोलीस आरोपींना पाठीशी का घालताय? आंदोलनकर्त्यांनी प्रश्न विचारल्यावर पळ काढणे, हे पुणे पोलिसांचे अपयश आहे!
जोपर्यंत पोलिसांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोलिस आयुक्तालय सोडणार नाही अशी माहिती वंचित बहुजन आघाडी चे नेते अँड.बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांचा फेसबुक वरुन जनतेला दिली.

या घटनेत, तीन दलित तरुणींनी कोथरुड पोलिसांवर छळ केल्याचा आरोप केला आहे आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर सध्या पुण्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, रोहित पवार आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून होते. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करावा, यासाठी या सगळ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंतु, पुणे पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता या मुलींना अवघ्या चार ओळींचे पत्र देत गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील परिक्रमा खोत यांनी पोलिसांसमोर मुलींची बाजू मांडली. त्यांनी म्हटले की, ‘ मुली वेड्या नाहीत, त्या खोटं बोलत नाहीत. कोणतीही मुलगी अशाप्रकरणात खोटं बोलणार नाही’, असे परिक्रमा खोत यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी शेवटपर्यंत याची दखल न घेता याप्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला.
पोलिसांवर ऍट्रॉसिटी लावा. मागास महिलानवर अत्याचार मारहाण जातीवाचक शिवीगाळ आणि विनयभंगाची केस ठोका..पीडित महिलेचा सासरा PSI आहे आणि नवरा सारकारी अधिकारी आहे. त्या मूळे पोलीस खात त्यांना सांभाळून घेत आहे. त्यांच्यावर सूनेला जाच करने, मारहाण करने, सुनेच्या जीवितला धोका निर्माण करने आणि सुनेला आत्महत्या करण्या प्ररुत्त करने या गुन्हा खाली तात्काळ अटक झालीच पाहिजे…


































