श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital Web portal online
भंडारा : 23 आँक्टोबर 2025
एकीकडे कांग्रेस सह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडुन RSS ही संघठनेवर बोगस, देशद्रोही,तथा समलैंगिक संगठन तसेच लैंगिक शोषणाचे आरोप लागलेत त्यांवर बंदी आणण्याची कित्येक राजकीय पक्षांनी मागणी केली RSS च्या कार्यालयांवर देशभरात मोर्चे काढले जात आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी RSS ला राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माण करिता कार्य करणारी प्रमुख संगठना सांगत RSS वर बंदी आणणारे मुर्ख आहेत अशी टीका बावनकुळेंनी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माण यासाठी कार्य करणारी देशातील प्रमुख संस्था आहे. या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे लोक मूर्ख आणि राष्ट्रद्रोही आहेत, अशी जोरदार टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भंडाऱ्यात केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात राष्ट्रभावना निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेत संघाची विचारधारा प्रतिबिंबित होते. त्यामुळे जो कोणी संघावर बंदी घालण्याचा विचार करतो, तो खरं तर राष्ट्रद्रोही आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
नाना पटोले यांनी ‘शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली’ असा आरोप केला होता,.त्यावर प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, “महाराष्ट्र सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत. विरोधक फक्त टीका करतात, पण त्यावरील उपाय दाखवत नाहीत.”
विरोधकांकडून वारंवार मत चोरीच्या आरोपांवरही बावनकुळे यांनी पलटवार केला. ते म्हणाले, “नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे इतर नेते खासगीत पराभव मान्य करतात. पण कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी ते लोकसमोर मत चोरीचे आरोप करतात. आता जनता महायुतीच्या मागे उभी आहे, त्यामुळे विरोधकांना आपला पक्ष आणि कार्यकर्ते टिकवण्यासाठी अशा खोट्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो.”
बावनकुळे म्हणाले, “कोण संजय राऊत? त्यांना उठल्यावर दिवसभर फटाके फोडायचे असतात. दीपावलीचा दिवस आहे, म्हणून फार सिरीयस होऊ नका. आम्हाला विकासाच्या राजकारणात भंडारा जिल्ह्याला पुढे न्यायचं आहे, बाकी फटाके फोडण्याचं काम त्यांच्यावर सोडा.”



























































