श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी/नागपुर : 27 आँक्टोबर 2025
पूर्वीचे बिडगाव-वडोदा सर्कल म्हणून ओळख असलेल्या या सर्कलमधुन बिडगाव हे स्वतंत्र नगरपंचायत केल्याने आता 24 गावांचा समावेश असलेले वडोदा – भुगाव हे नविन जिल्हा परिषद सर्कल तयार झाले असुन कांग्रेस व भाजप मधील इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने पक्षनेत्रृत्वाचा आदेश कुणीच मानणार नाही असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

कांग्रेस मध्ये तिकिटासाठी घमासान. बिडगाव नगरपंचायतीत गेल्यानंतर 24 गावांचा स्वतंत्र सर्कल मागीलवेळी ओबीसी महिलांसाठी आरक्षित, आता खुल्या प्रवर्गात परिणामी दोन्ही पक्षांत पुरुष नेत्यांची चढाओढ सुरू झाली आहे. कामठी तालुक्यातील वडोदा- भूगाव सर्कल खुल्या प्रवर्गात आल्याने या क्षेत्राच्या माजी जिल्हा परिषद सदस्या व माजी महिला व बालकल्याण सभापती प्राण. अवंतिका लेकुरवाळे यांचे ही नाव आघाडीवर आहे. तर मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी सुद्धा पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण त्यांना न मिळाल्याने त्या नाराज असल्याचे बोलले जात होते. विधानसभेतील कांग्रेस चे उमेदवार सुरेश भोयर यांचा पराभव झाला काँग्रेस उमेदवार सुरेश भोयर व प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्यात कटुता निर्माण झाली असल्याची चर्चा रंगली होती. कांग्रेस नेता सुनील केदार यांच्या समर्थक असलेल्या प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषद ची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर कांग्रेस कडुन पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी ग्रा पं. सदस्य सोपान गभने यांना कांग्रेस मध्ये आणणाऱ्या सोपान गभने यांना सुरेश भोयर यांनी उमेदवारी चा शब्द दिल्याचे समजते. तर वडोदा सरपंचपद व पं. स. वडोदा सीटकरिता उभे राहिलेल्या सोपान गजभिये यांना पराभूत करणारे कामठी पं. स. उपसभापती दिलीप वंजारी हे सुद्धा कॉग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्यास पुन्हा एकदा धोबीपछाड देण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवु शकतात. तर कामठी क्रृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती अनिकेत पुरुषोत्तम शहाणे पाटील जे सध्या टेमनसना(परसोडी कुसुंबी) गटग्रामपंचायत चे युवा उच्चशिक्षित सरपंच आहेत, त्यांनी सुद्धा कांग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.ते सुद्धा कॉग्रेस नेता सुनील केदार व सुरेश भोयर यांचे खास समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे कॉग्रेस पक्षांपुढे गटबाजी थांबवण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. सोपान गभने यांची बैनरबाजी सध्या चर्चेचा विषय ठरला असला तरी ग्रामीण भागात ग्राऊंड लेव्हल वर जनसंपर्क कमी असल्याचे त्यांचे विरोधक म्हणतात. प्रा. अवंतिका लेकुरवाळे ह्या सहजासहजी आपले सर्कल सोडणार नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत 2 वेगवेगळे गट आमनेसामने येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वडोदा पंचायत समिती करिता सोनम छत्रपाल करडभाजने यांचे नाव भुगाव पं. स. करिता मनोहर कोरडे यांचे नाव सध्या आघाडी वर असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. छत्रपाल करडभाजने हे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांनी मागे पं. स. निवडणुकीत जवळपास 1700 मते घेतली होती. तर वडोदा जिल्हा परिषद सर्कल ची निवडणुक सोनम छत्रपाल करडभाजने यांनी प्रहार तर्फे कांग्रेस उमेदवार प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांचे विरोधात लढली होती या निवडणुकीत सोनम करडभाजने पराभुत झाल्या होत्या. कालांतराने छत्रपाल करडभाजने यांनी प्रहार पक्ष सोडला व सुरेश भोयर यांचेकडे कॉग्रेस मध्ये प्रवेश घेतला होता. सध्या छत्रपाल करडभाजने हे सुरेश भोयर यांचे खास समर्थक म्हणून ओळखले जातात.
कामठी विधानसभेत एक कर्तबगार व ग्राऊंड लेवल वर उतरुन काम करणाऱ्या माजी सभापती प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनीही राजकारणात आपले वलय निर्माण केले आहे. वडोदा भुगाव सर्कल मध्ये कांग्रेस अंतर्गत दोन गट असल्याचे बोलले जाते. प्रा. अवंतिका लेकुरवाळे काय भुमिका घेतात? याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे. गटबाजी उफाळून आल्यास इथे भोयर व लेकुरवाळे गट आमनेसामने येऊ शकतो.
नागपूर जिल्हा अध्यक्ष अश्विन बैस हे कांग्रेस नेता सुनील केदार यांचे आदेशानुसार च उमेदवारी जाहीर करतील उमेदवारांच्या यादीवर कॉग्रेस चे माजी मंत्री सुनील केदार यांचाच निर्णय अंतिम निर्णय ठरणार आहे.

भाजपा अंतर्गत उमेदवारी वरुन गटबाजीला उधान? एका सीटसाठी 5 उमेदवार
वडोदा भुगाव सर्कल मध्ये भाजपा कडुन अनिल निदान यांचे नाव पुढे येताच त्यांना बाहेरचे पार्सल/उमेदवार म्हणुन त्यांचेवर ठपका ठेवण्यात आला. यावेळी त्यांचे सर्कल महिला राखीव झाल्याने त्यांनी त्यांचा मोर्चा वडोदा सर्कल कडे वळविला. महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निकटवर्तीय म्हणुन त्यांना ओळखले जाते. परंतु स्थानिक पातळीवर अनिल निदान यांना बाहेरचे म्हणून टीकेचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी भाजपकडून दोन वेळा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झालेल्या अनिता चिकटे यांचे पती रमेश चिकटे एकदा परत भाजप कडे उमेदवार मागितली आहे. परंतु दोनवेळा पराभुत झाल्याने रमेश चिकटे यांना तिकिट देऊ नये याकरिता दुसरे उमेदवार प्रयत्नशील आहेत. भाजप चे सचिन घोडमारे यांनी सुध्दा जिल्हा परिषद करिता उमेदवारी मागितली असुन त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला आहे. ते उमेदवारी साठी नवा दमदार उमेदवार म्हणून स्वतःला प्रेजेंट करीत आहेत.
तर भाजप कामठी अध्यक्ष म्हणून राहिलेले किशोर बेले हे सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उत्सुक उमेदवार आहेत. तर वडोदा चे उपसरपंच राहिलेले विशाल चामट यांनी सुद्धा पक्षाला उमेदवारी मागितली आहे.
त्यामुळे वडोदा जिल्हा परिषद सीटकरिता एकुण 5 उमेदवार असल्याने भाजपात ही मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ शकते.
महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपमधील बंडखोरीचा वादळ शमवतील पण पक्षाचा उमेदवार निवडून आणणे त्यांच्यासाठी आव्हान ठरणार आहे. कामठी विधानसभेत त्यांची झालेली पीछेहाट यामुळे सध्या तेच अडचणीत असुन त्याचा राग ते सार्वजनिक रित्या सभेतुन काढतांना दिसत आहेत.
कामठी विधानसभेत परत एकदा सुनील केदार विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे असा जंगी सामना निवडणुक प्रचारादरम्यान दिसणार आहे.

































